Budget 2022: महागाई महागाई, मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?

| Updated on: Feb 01, 2022 | 3:00 PM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या आहेत. तसेच महागाईने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्नही या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. मोबाईल फोन, चार्जर, कॅमेरा लेन्स आदी इलेक्ट्रीक वस्तूंसह कपडे आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत.

Budget 2022: महागाई महागाई, मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?
काय स्वस्त आणि काय महाग?
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण ( Nirmala Sitharaman) यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात  (Budget 2022) अनेक घोषणा केल्या आहेत. तसेच महागाईने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्नही या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. मोबाईल फोन, चार्जर, कॅमेरा लेन्स आदी इलेक्ट्रीक वस्तूंसह कपडे आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच यंदाच्या बजेटमध्ये कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे नोकरदारांच्या पदरी निराशा आली आहे. या शिवाय कृषी क्षेत्रावर या अर्थसंकल्पात विशेष फोकस करण्यात आला असून त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. या शिवाय कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर हेल्थ सेक्टरवरही या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थमंत्री म्हणून चौथा अर्थसंकल्प सादर केला. तब्बल दोन तासाच्या या भाषणात त्यांनी अनेक घोषणा करतानाच देशाच्या विकासाचा रोडमॅपच मांडला. यावेळी त्यांनी काही वस्तू स्वस्त करून मोठा दिलासा दिला आहे. मोबाईल फोन चार्जरचा ट्रान्सफार्मर आणि कॅमेरा लेन्सवरील आयात शुल्क घटवण्यात आलं आहे. त्यामुळे मोबाईल फोन चार्जर स्वस्त होणार आहेत. तसेच देशात निर्माण होणारे मोबाईलही स्वस्त होणार आहेत. देशांतर्गत मोबाईल निर्मिताला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

कस्टम ड्युटी घटवली

या शिवाय अर्थमंत्री सीतारामण यांनी काही केमिकल्सवरील कस्टम ड्युटी घटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मिथेनॉलचा समावेश आहे. देशांतर्गत मॅन्यूफॅक्चरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. स्टिल स्क्रॅपवरील कस्टम ड्युटीवरही सूट एक वर्षाने वाढवण्यात आली आहे. तसेच जेम्स अँड ज्वेलरीवरील कस्टम ड्युटी 5 टक्क्यांनी घटवण्यात आली आहे. त्यामुळे जेम्स अँड ज्वेलरी स्वस्तात मिळणार आहेत.

काय स्वस्त होणार

चामडे

बूट

चपला

विदेशी सामान

कपडे

शेतीशी संबंधित वस्तू

पॅकेजिंग डब्बे

पॉलिश केलेले डायमंड

परदेशी छत्र्या

मोबाईल फोन

मोबाईल चार्जर

जेम्स अँड ज्वेलरी

काय महागणार

कॅपिटल्स गुड्सवर आयात शुल्कावरील सूट रद्द करण्यात आली आहे. आता कॅपिटल्स गुड्सवर 7.5 टक्के आयात शुल्क आकारण्यात येणार आहे.

 

संबंधित बातम्या:

Budget 2022 : आपत्कालीन विम्यांतर्गत 5 लाखांची मदत, केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!

Agriculture Budget-2022: शेतकऱ्यांना मिळणार डिजीटल सेवांचा आधार, शेती व्यवसयाला काय होणार

BUDGET 2022: 60 लाख नव्या नोकऱ्या, 400 वंदे भारत ट्रेन; बजेटची ओपनिंग धडाकेबाज घोषणांनी!