Nirmala Sitharaman Net Worth: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण (Niramal Sitaraman) यांच्या कामाचं कौतुक फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील होतं. निर्मला सितारामण यांना एक सशक्त महिला म्हणून ओळखण्यात येतं. निर्मला सितारामण कायम नवीन आव्हान स्वीकारताना दिसतता. एक सेल्सवूमेन (Saleswoman) ते देशाच्या अर्थमंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास फार प्रेरणादायी आहे. निर्मला सितारामण देशाच्या दुसऱ्या अर्थमंत्री आहेत. निर्मला सितारामण यांच्यापूर्वी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७०-७१ मध्ये अर्थमंत्री पदाची धुरा सांभाळली.
बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करत आहेत. देशाचं अर्थसंकल्प सादर करुन अनेकांना दिलासा देणाऱ्या निर्मला सितारामण यांच्या संपत्तीचा आडका तुम्हाला माहिती आहे का? २०२० मध्ये निर्मला सितारामण यांच्याकडे १.३४ कोटी रुपयांची संपत्ती होती.
निर्मला सितारामण आणि त्यांच्या पतीकडे ९९.३६ लाख रुपयांचं घर आहे. शिवाय त्यांच्याकडे १६.०२ लाख रुपयांती शेत जमीन देखील आहे. २०२० सालच्या रिपोर्टनुसार अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्याकडे कोणतीही कार नाव्हती. आता त्यांच्याकडे एक बजाज कंपनीची स्कुटर आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण यांची एकून संपत्ती १८.४ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण या आज पक्षाचा प्रमुख चेहरा आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक अनेक मुद्द्यांवर ठाम भूमिका घेतल्या आहेत. सितारामण १९९१ साली भारतात परतल्या. त्यानंतर २००३ ते २००५ पर्यंत त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या आध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यानंतर २००६ साली सितारामण यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला.
भाजपा पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून आल्या. त्यानंतर २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. ५ जुलै रोजी निर्मला सितारामण यांनी देशाचा बजेट सादर केला. त्यानंतर १ फेब्रुवारी २०२० मध्ये निर्मला सितारामण यांनी २०२०-२१ वर्षाचं बजेट सादर केलं. आता निर्मला सितारामण Budget 2023 सादर करत आहेत.