नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरुन (Share Market) दिसून आला. सेंन्सेक्स वर 16 आणि निफ्टीवर 19 शेअर्सची घसरण नोंदविली गेली. आज (शुक्रवारी) 76.71 अंकांच्या घसरणीसह सेन्सेंक्स 57,200.23 वर पोहोचला आणि निफ्टी 8.20 अंकांच्या घसरणीसह 17,101.95 वर बंद झाला. काल (गुरुवारी) सेंसेक्स 581.21 अंकांच्या घसरणीसह 57,276.94 वर आणि निफ्टी 167.80 अंकांच्या घसरणीसह 17,110.15 वर बंद झाले होते. अमेरिका ट्रेडरी बाँडच्या यील्डमध्ये वाढ, परकीय गुंतवणुकदारांचा (FOREGIN INVESTMENT) निरुत्साह तसेच कोरोनाचा नवा विषाणू ‘ओमिक्रॉन’च्या वाढत्या प्रादूर्भावामुळे शेअर बाजारात अस्थिरतेचं चित्र कायम राहिलं. सेंन्सेक्सवर अॅक्सिस बँक (AXIS BANK) सह इंड्सइंड बँकिंग शेअर्समध्ये तेजी दिसून आली. निफ्टी आयटी स्टॉक्सने देखील बाजार सावरला.
• एनटीपीसी (3.81)
• यूपीएल (2.37)
• सन फार्मा (1.88)
• ओएनजीसी (1.87)
• इंड्सइंड बँक (1.74)
• मारुती सुझूकी (-3.05)
• टेक महिंद्रा (-2.41)
• पॉवर ग्रिड कॉर्प(-2.16)
• आयसीआयसीआय बँक(-1.70)
• हिरो मोटोकॉर्प (-1.58)
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे बड्या गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतल्याचे चित्र आज दिसून आले. येत्या अर्थसंकल्पात मार्केट अनुकूल धोरण असण्याची उद्योग जगताला आशा आहे. ओमिक्रॉनचं सावट दूर करण्यासाठी काही प्रोत्साहन योजना अर्थसंकल्पातून मांडल्या जातात का याकडे अर्थवर्तृळाचे लक्ष लागले आहे.
शेअर बाजाराला पुन्हा उसळी येण्यासाठी मार्केट अनुकूल धोरण, पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद तसेच कर संरचनेतील फेरबदल आवश्यक असल्याचे अर्थविश्लेषकांनी म्हटले आहे.
भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने नव्या अॅपची घोषणा केली आहे. वैयक्तिक ट्रेडिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शेअर बाजाराचे सर्व अपडेट एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी ‘साथी’ (Saarthi) अॅप लाँच केले आहे. सध्या इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध असणारे ‘साथी’ अॅप आगामी काळात भारतातील सर्व प्रादेशिक भाषेत उपलब्ध होणार आहे.
इतर बातम्या :