Budget 2022: अर्थसंकल्प हा शद्ब आपल्याला नवीन नाही. दरवर्षी अर्थसंकल्प सादर केला जातो. बजेट तयार करण्याची प्रक्रिया आज सुद्धा पारंपारिक आणि गोपनीयतेशी जोडली गेलेली आहे. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प(Budget 2022) तयार होण्यास सुरुवात होते, अशा वेळी अर्थ मंत्रालया (Finance Minister) ची मुख्य इमारत नॉर्थ ब्लॉक (North Block) पूर्णपणे बंद केली जाते. सर्व अधिकाऱ्यांना वारंवार जास्तीत जास्त गोपनीयता बाळगण्याबद्दल सांगितले जाते, तसेच या बद्दलच्या अनेक सूचना सुद्धा दिल्या जातात आणि या सर्व अधिकाऱ्यांवर विशेष निगराणी सुद्धा ठेवली जाते. एवढेच नाही तर जर तुम्हाला अर्थसंकल्पाची एखादी कॉपी काही तासांपूर्वी जरी हातामध्ये आली तरी त्या अर्थसंकल्पामधील एखादा भाग जोपर्यंत अर्थसंकल्पामध्ये सादर केला जात नाही तोपर्यंत तुम्ही तो भाग सार्वजनिक करू शकत नाही. अनेकदा काही वरिष्ठ पत्रकार यांच्या हाती बजेटची एखादी कॉपी आधीच मिळून जाते परंतु यांच्यावर सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर राहते, जेणेकरून बजेट सादर होण्यापूर्वी त्या भागाचा कोणताही मजकूर छापला जाऊ नये, याची विशेष काळजी घेतली जाते. अशा प्रकारची विशेष गोपनीयता ठेवण्यामागे खरे म्हणजे जोपर्यंत अर्थमंत्र्यांचे अर्थ संकल्पाचे भाषण सादर होत नाही तो पर्यंत या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ही विशेष काळजी घेण्यात येते.
1850 च्या दशका पासून सुरू झाली ही परंपरा
ही परंपरा 1850 च्या दशकापासून ग्रेट ब्रिटनमध्ये सुरू झाली त्यावेळेस विलियम ग्लेडडस्टोन 1852 ते 55 पर्यंत राजकोषाचे चान्सलर होते. ग्लेडस्टोन नंतर पंतप्रधान सुद्धा बनले. सर्वात गंमतीची गोष्ट म्हणजे की ब्रिटनमध्ये या परंपरेला हिंदुस्तानी शब्द बजट पर्दा – च्या रूपात मानले गेले आणि ग्लेडडस्टोन यांच्या काळापासूनच ही एक परंपरेची सुरुवात करण्यात आली की जोपर्यंत चान्सलर हे अर्थसंकल्प सादर करत नाही त्याच्याआधी या अर्थसंकल्पामधील कोणताच भाग किंवा एखादा मजकूर लीक झाला नाही पाहिजे.
1947 मध्ये चान्सलर ह्यूग डाल्टन यांना अर्थसंकल्पाच्या दिवशी सकाळी अर्थसंकल्प सादर करण्या आधी अर्थसंकल्पामधील काही तरतुदी लिक झाल्याच्या कारणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी एका पत्रकाराला आपण जो अर्थसंकल्प सादर करणार आहोत त्या अर्थसंकल्पाबद्दल आधीच सांगितले होते आणि पत्रकाराने डाल्टन यांच्या अर्थसंकल्प सादर करण्याच्या भाषणा आधीच ज्या काही तरतुदी होत्या त्या वर्तमानपत्रांमध्ये छापल्या आणि लोकांना याबद्दलची माहिती आधीच कळली.
भारतात सुद्धा 1950 मध्ये अर्थसंकल्पातील काही भाग लीक झाला होता. त्यानंतर अर्थसंकल्प प्रिंट करण्याचे काम राष्ट्रपतीभवन प्रेस म्हणजेच गव्हर्नमेंट प्रेस रोड येथे शिफ्ट करण्यात आले. खरेतर 1980 नंतर अर्थसंकल्प नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंट मधूनच छापण्यात येऊ लागला. हलवा सेरेमनीच्या नंतर अर्थसंकल्प प्रिंट करण्यासंबंधित जे काही अधिकारी असतात त्यांना नॉर्थ ब्लॉकमध्ये क्वारंटाइन केले जाते. त्यानंतर पुढील दहा दिवसापर्यंत हे अधिकारी अर्थमंत्रालयाच्या बेसमेंटमध्ये आपल्या कुटुंबापासून आणि इतर अन्य लोकांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधत नाही आणि फक्त अर्थसंकल्प छापण्याचे काम करत असतात.
खरंतर काही काळापासून ब्रिटनने अर्थसंकल्प पडदा सिस्टिम बंद केली आहे . तसेतर सरकारच्या अर्थसंकल्प प्रस्तावामध्ये एक सातत्यता असते. आर्थिक आणि कर सुधार संबंधित एक आराखडा तयार केला जातो,लोकांना सर्वच माहिती आधीच कळून जाते अशातच अर्थसंकल्प संबंधित कोणतीही गुप्तता ठेवण्याचा कोणताच अर्थ राहत नाही. 1997 ते 2007 पर्यंत राजकोषचे चांसलर राहिलेले गॉर्डन ब्राउन जेव्हा पंतप्रधान बनले तेव्हा त्यांनी या बजेट पडदा म्हणून जी सिस्टम होती त्या पद्धतीला पूर्णविराम दिला. आता तेथे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण माहिती दिली जाते आणि त्यावर चर्चा सुद्धा केली जाते. अशा पद्धतीने लोक अर्थसंकल्पासंदर्भातील ज्या काही महत्त्वपूर्ण घोषणांबद्दल गोष्टी होत्या त्या सर्व बाबीं लोकांना आधीच कळून जायचे.
Budget 2022 : कृषी क्षेत्राच्या नजरेतून अर्थसंकल्प ; सरकारच्या भूमिकेवरच सर्वकाही अवलंबून..!