अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात 5G सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी 100 प्रयोगशाळा निर्माण करण्याची घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना 5G सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी 100 प्रयोगशाळा स्थापन करण्याची घोषणा केली. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात 5G सेवेचे उद्घाटन केले होते. सध्या देशात रिलायन्स जिओ आणि एअरटेल 5G नेटवर्कची सुविधा देत आहेत.
टेलिकॉम क्षेत्र हा देशातील प्रमुख उद्योग आहे. 5G नेटवर्क आल्यानंतर भारतातील लोकांना जलद गतीने इंटरनेट चालविण्याची सुविधा मिळू लागली आहे. सध्या निवडक शहरांमध्ये 5G इंटरनेटचे कव्हरेज असले तरी टेलिकॉम कंपन्या वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगाने 5G सुरू करत आहेत.
5G च्या शुभारंभावेळी केंद्रीय कॅबिनेट मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरसंचार उद्योगात 5G साठी 100 प्रयोगशाळा उभारण्याची विनंती केली होती. या 100 प्रयोगशाळांपैकी 12 प्रयोगशाळा इन्क्युबेटरमध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. या माध्यमातून टेलिकॉम क्षेत्रात रस असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन प्रयोगांना चालना देता येईल.
हायस्पीड इंटरनेटला प्रोत्साहन देण्यासाठी 5G लॅबचा वापर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत जिथे या प्रयोगशाळा खूप महत्वाची भूमिका बजावतील. या प्रयोगशाळांमुळे खासगी क्षेत्राला स्वयंचलित चाचणीची सोय होणार आहे.
अकादमी आणि सरकारशी संबंधित लोक भविष्याशी संबंधित संकल्पना प्रत्यक्षात आणू शकतील. मॅन्युफॅक्चरिंग आणि हेल्थकेअर सारख्या विविध क्षेत्रांमध्ये 5G चा वापर आणखी सुधारला जाऊ शकतो.
रिलायन्स जिओ आणि एअरटेल 5G सेवा देत आहेत. 5G च्या माध्यमातून युजर्स सुपरफास्ट स्पीडचा फायदा तर घेऊ शकतातच, शिवाय ऑगमेंटेड रिॲलिटी, व्हर्च्युअल रिॲलिटी सारख्या गोष्टींचाही फायदा घेऊ शकतात. या तंत्रज्ञानाचा फायदा केवळ टेलिकॉम क्षेत्रालाच नाही तर इतर क्षेत्रांनाही होणार आहे.