नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) काही वेळातच 2023-2024 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा अर्थसंकल्प आहे. यंदाही हा बजेट पेपरलेस असणार आहे. या अर्थसंकल्पातून देशाचा आर्थिक विकासावर भर दिला जाणार आहे. तसेच अर्थव्यवस्थेशी संबंधित अनेक मोठे निर्णय होणार आहेत. तसेच सरकारी योजना आणि नोकरदार वर्गासाठी अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
आज अर्थसंकल्प सादर होत आहे. त्यामुळे अनेकांना बजेटपासून उत्सुकता आहे. हा बजेट कसा पाहावा असं अनेकांच्या मनात येत आहे. चालता फिरता आणि काम करतानाही बजेट कसा पाहावा? काम करत असताना मोबाईलवर बजेट कसा पाहावा? असं अनेकांना वाटत आहे. अनेकजण कामात बिझी असल्याने त्यांना हा प्रश्न पडल्यावाचून राहिला नसेल. तुमच्या याच प्रश्नांची आज आम्ही उत्तरे देत आहोत.
देशभरातील सामान्य लोकांसाठी हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मात्र, जेव्हा अर्थसंकल्प सादर होईल, तेव्हा टीव्हीवर बसून बजेट पाहता येत नसेल तर टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला काही माहिती देत आहोत. काही तंत्र सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला बजेटचे थेट प्रक्षेपण म्हणजे लाईव्ह स्ट्रिमिंग मोबाईलवर पाहता येणार आहे.
तुम्हाला बजेटचं लाइव्ह स्ट्रिमिंग पाहायचं असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्हाला टीव्हीसमोर बसता आलं नाही म्हणून काय झालं? टीव्ही तर तुमच्या मोबाईलमध्येच आहे. तुम्हाला फक्त टीव्ही9 मराठीच्या चॅनलवर जाऊन प्लेचं बटन दाबायचं आहे. मग तुम्ही कुठेही असला तरी तुम्हाला बजेट पाहता येणार आहे.
थोड्याच वेळात 11 वाजता बजेट सुरू होईल. तेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमधील युट्यूब चॅनलवर जा. तिथे टीव्ही9 मराठीचं चॅनल ओपन करा आणि प्लेचं बटन सुरू करा. तुम्हाला बजेटचं थेट लाईव्ह प्रक्षेपण दिसेल. संसद टीव्ही सुद्धा संसदेतील कामकाजाचं लाईव्ह प्रसारण करणार आहे. त्याशिवाय दुसरा एक पर्याय आहे. गुगलवर जा. तिथे टीव्ही9 मराठी सर्च करा. टीव्ही9 मराठीच्या साईटवर गेला की तुम्हाला टीव्ही9 मराठीची लाइव्ह टीव्ही दिसेल. त्यातून तुम्हाला बजेटचं लाईव्ह प्रक्षेपण पाहता येईल.
Budget 2023 LIVE : अर्थसंकल्पाच्या पेजवर जाण्यासाठी क्लिक करा
Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या घोषणा आणि परिणाम
Budget 2023 : बजेट 2023 च्या हायलाईटस