मुंबईः कोरोनाच्या संकटाकाळानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना 2022-23 चा अर्थसंकल्प (Budget 2022-23) मांडला. यावेळी अर्थमंत्र्यांनी कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीच्या आधारे हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कृषीबरोबरच आरोग्य सुविधांवरही भर देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पाचे हे विशेष आहे की, 1 ट्रिलयनची अर्थव्यवस्था असलेले महाराष्ट् हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी (Health Sector) 5 हजार 244 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयाना अत्याधुनिक सोयी सुविधांची तरतूद करण्यात आली असून हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर ,रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये स्थापन करणार असल्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे.
हा अर्थसंकल्प पंचसूत्रीच्या आधारे मांडण्यात आला असून पहिल्या सूत्रामध्ये कृषी व संलग्न,दुसऱ्या सूत्रात सार्वजनिक आरोग्य तिसऱ्या दळणवळण, चौथ्या उद्योग त्यानंतर स्मारक, पर्यटन आणि महामंडळे अशा सूत्रात या अर्थसंकल्पाची विभागणी करण्यात आहे.
या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री मांडून कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आले आहेत तर येत्या तीन वर्षांत 4 लाख कोटी रूपये उपलब्ध करुन देणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 23 हजार 888 कोटीची तरतूद करुन आरोग्य क्षेत्रासाठी 5 हजार 244 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर मानव व मनुष्यबळ विकासासाठी 46 हजार 667 कोटी तरतूद करुन पायाभूत सुविधा व वाहतूकीसाठी 28 हजार 605 कोटी रुपये देण्यात आले आहेत. उद्योग व उर्जा विभागासाठी 10 हजार 111 कोटींची तरतूद अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
संबंधित बातम्या