EP 07 : Bus Evadach Swapna Aahe | लघू-मध्यम उद्योगांच्या बजेटकडून काय अपेक्षा?

| Updated on: Jan 31, 2022 | 12:42 PM

पुण्यातील प्रिंटिंग प्रेस चालवणारे जतीन कुलकर्णी यांचा व्यवसाय चांगला सुरू होता. मात्र, मार्च 2020 मधील लाकडाऊनच्या रुपानं त्यांच्या जीवनात वादळ धडकलं. आतापर्यंत त्यांच्या आदिश्वर मल्टी प्रिंटकडे मोठे आणि चांगले ग्राहक होते. मात्र, कोरोनानंतर भाग्यानं साथ दिली नाही. कोरोनामुळे सहा महिने व्यवसाय ठप्प होता.

EP 07 : Bus Evadach Swapna Aahe | लघू-मध्यम उद्योगांच्या बजेटकडून काय अपेक्षा?
budget expectations
Follow us on

पुण्यातील (Pune) प्रिंटिंग प्रेस चालवणारे जतीन कुलकर्णी यांचा व्यवसाय चांगला सुरू होता. मात्र, मार्च 2020 मधील लाकडाऊनच्या (Lockdown) रुपानं त्यांच्या जीवनात वादळ धडकलं. आतापर्यंत त्यांच्या आदिश्वर मल्टी प्रिंटकडे मोठे आणि चांगले ग्राहक होते. मात्र, कोरोनानंतर भाग्यानं साथ दिली नाही. कोरोनामुळे (Corona) सहा महिने व्यवसाय ठप्प होता. कोरोनाच्या फटक्यातून सावरत असतानाच दुसरी लाट आली. कोरोनाच्या आधी त्यांच्या कंपनीची उलाढाल 5 कोटी रुपयांपर्यंत होती. आता 3 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल होतेय म्हणजेच जवळपास 50 टक्क्यानं उलाढालीत घट झालीय. 2021 मध्ये हुळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच ओमिक्रॉनने धडक दिली. प्रिंटिंग व्यवसायाची परिस्थिती आधीपासूनच खराब होती, असं जतिन सांगतात. बँकांकडून कर्ज घेऊन ज्यांनी व्यवसाय सुरू ठेवला त्यांना कर्जाची परतफेड करणंही अवघड झालंय. वर्क फ्रॉम होम, शाळा आणि कॉलेज बंद तसेच मोठे कार्यक्रमही होत नसल्यानं छपाईचं काम ठप्पचं झालंय. ग्राहक मोठाले ब्रोशर छापण्याऐवजी आता पीडीएफचा वापर करून काम भागवू लागले आहेत.

कोरोनानंतर लघू उद्योग संकटात

लघू उद्योगाची स्थिती तर याहून अधिक खराब होती. कोरोनाच्या फटक्यानंतर अनेक उद्योगाचं अस्तित्व संपलं. कृषी क्षेत्रानंतर MSME मध्ये देशात सगळ्यात जास्त रोजगारनिर्मिती होते. मध्यम आणि लघू उद्योगातून जवळपास 11 कोटी लोकांना रोजगार मिळालाय. MSME चा जीडीपीमध्ये 30 टक्के आणि निर्यातीमध्ये 48 टक्के वाटा आहे. अशातच अनेक मध्यम आणि लघू व्यवसाय बंद झाल्यानं अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला.

लघू आणि मध्यम उद्योग व्यवसायाची संघटना MSMEX च्या सर्वेक्षणानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका 70 टक्के उद्योगांना बसलाय. कोरोनाच्या लाटेतून झालेल्या नुकसानीतून अद्याप सावरलं नसल्याचं 50 टक्के व्यावसायिकांनी सांगितलंय. कोरोनाच्या सामना करण्यासाठी सुमारे 43 टक्के व्यावसायिकांनी त्यांचं बिझनेस मॉडेल बदललंय.