नवी दिल्लीः जेव्हा जेव्हा आपण पेट्रोल पंपावरून वाहनात पेट्रोल टाकता, तेव्हा याचा अर्थ असा होत नाही की आपल्या वाहनात 100% शुद्ध पेट्रोल टाकले जाते. या पेट्रोलमध्ये एक विशेष प्रकारचा पदार्थही मिसळला जातो आणि एक विशेष गोष्ट म्हणजे हा विशिष्ट पदार्थ आपल्या वाहनासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. आता आपण असा विचार करत असाल की, पेट्रोल पंपवाले लोक हे चुकीचे करीत आहेत, त्यांनी हे करू नये. पण हे पेट्रोल पंपचालक ते स्वबळावर करत नसून सरकारच्या धोरणामुळे हे केले जात आहे.
अशा परिस्थितीत पेट्रोल पंप इंधनात काय मिसळत आहेत आणि वाहनाचे नुकसान कसे होते हे जाणून घेऊयात. तसेच या विशिष्ट भेसळीत सरकारचे धोरण काय आहे हे देखील तुम्हाला कळेल. याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टी जाणून घ्या…
भारत सरकारने पेट्रोल कंपन्यांना देशभरात पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळण्याची परवानगी दिलीय. यामुळे आता पावसाळ्यात वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, पेट्रोल पंप मालकदेखील या निर्णयामुळे नाराज आहेत. पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनना असा विश्वास आहे की, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जाते, याची लोकांना माहिती नाही. वाहन अडचणीत असल्यास लोक पेट्रोल पंप मालकांविरुद्ध तक्रार करतात.
राजस्थान स्थित पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे सरचिटणीस संदीप भागेरिया यांनी टीव्ही 9 ला सांगितले, “पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्याचे सरकारचे धोरण आहे. या कारणास्तव हे पेट्रोलमध्ये मिसळले जाते. आता ही मात्रा 10 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची चर्चा सुरू आहे आणि इथेनॉलकडे सरकारचे विशेष लक्ष आहे.
अहवालानुसार, जेव्हा पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जाते, तेव्हा ते पेट्रोल पाण्याशी संपर्कात आल्यास सर्व इथेनॉल पाण्याचे बनते, जे वाहनाच्या इंजिनवर परिणाम करू शकते. असे सांगितले जात आहे की, इथेनॉल उसाच्या रसापासून बनवले गेलेय आणि जर ते पेट्रोलमध्ये मिसळले आणि पेट्रोलचा पाण्याशी संपर्कात आला तर पेट्रोलमध्ये आढळणारे सर्व इथेनॉल पाण्याचे होऊ शकते.
संदीप भागेरिया यांनीही सांगितले की, ‘आता ग्राहक अनेक पेट्रोल पंपावर अशा तक्रारी घेऊन येत आहेत आणि पेट्रोल पंपावर आरोप करीत आहेत. मात्र, सरकारच्या धोरणानुसारच हे पेट्रोल पंपचालक करीत आहेत. अशा परिस्थितीत सरकारने किंवा पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोलमध्येही इथेनॉल मिश्रित असल्याचा प्रचार केला पाहिजे आणि अशा स्थितीत वाहनाची टाकी कशी संरक्षित करावी याबद्दल लोकांना जागरूक केले पाहिजे.
संदीप भगेरिया म्हणाले, ‘खरंच पावसाळ्यात किंवा कधी कधी कार धुताना, पेट्रोल टाकीमध्ये हलके पाणी गेले तर लोक अडचणीत येऊ शकतात. अशा परिस्थितीत लोकांनी यावेळी त्यांच्या कारच्या पेट्रोल टँकची विशेष काळजी घेतली पाहिजे.
संबंधित बातम्या
PM Kisan Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के सबसिडी, फायदा कसा मिळवायचा ते जाणून घ्या
ATM मधून रंग लागलेली नोट बाहेर आली तर काय करावे? नियम काय सांगतो?
100% pure petrol is not put in your car, mixture of Ethanol, What exactly is the loss?