मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(EPFO)त या ऑक्टोबर महिन्यात 12.73 लाख सदस्यांनी नवीन नोंदणी केली आहे. EPFO सध्या 6 कोटींच्या घरात लाभधारक आहेत. गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत ही वाढ 10.22 टक्के अधिक आहे. श्रम मंत्रालयाने सोमवारी याविषयीची माहिती समोर आणली. नवीन आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2021मध्ये 12.73 लाख सदस्यांनी नवीन नोंदणी केली आहे. एक वर्षापूर्वी ऑक्टोबर 2020मध्ये ईपीएफओत 11.55 लाख सदस्यांनी नोंदणी केली होती.
महिलांचे प्रमाण 21 टक्के
ऑक्टोबरमध्ये नव्याने जोडलेले 7.57 लाख सदस्य पहिल्यांदा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अधिनियम 1952नुसार नोंदविण्यात आले. त्यातच या महिन्यात जवळपास 5.16 लाख सदस्यांनी ईपीएफओपासून वेगळे होत खाते बदल करत पुन्हा जोडले गेले. श्रम मंत्रालयानुसार, वेतन आकड्यांचे विश्लेषण केले असता, 22-25 वर्षाच्या कर्मचाऱ्यांचा भरणा अधिक आहे. महाराष्ट्र, हरयाणा, गुजरात, तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यात 7.72 लाख नवीन सदस्य जोडणी करण्यात आली. यात महिलांचे प्रमाण 21.14 टक्के इतके आहे.
बॅलन्स टेक करण्याच्या स्टेप्स
1) बॅलन्स चेक करण्यासाठी EPFO सदस्यांना EPFOHO UAN ENG टाइप करावं आणि 7738299899 या क्रमांकावर SMS पाठवावा.
2) अथवा 011-22901406 या दुरभाष केंद्रावर एक मिस कॉल करावा. त्यानंतर तुम्हाला पीएफ खात्यातील शिल्लक रक्कमे संदर्भात एक एसएमएस येईल.
3) ईपीएफओ वेबसाइट वर जाऊन तुम्ही पीएफ बॅलन्स तपासू शकता
4) यूएएन और ओटीपी क्रमांकासह उमंग ॲपवरून पीएफ पासबुक बघू शकता
महत्त्वाचा अलर्ट
पीएफ खातेधारकांना (PF Account holders) नामनिर्देशीत व्यक्तीचं नाव आणि इतर माहिती जोडण्याची कालमर्यादा संपतेय. नाॉमिनी (nominee) अॅड करण्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे तर नुकसानही तुमचेच होणार आहे. काही दुर्घटना घडली तर तुमच्या वारसाला, कुटुंबातील व्यक्तींना तुमच्या रक्कमेवर दावा करण्यात अडथळा येऊन नये यासाठी पीएफ कार्यालयानं (Provident Fund) ही कसरत चालवलीय. वारसदाराचं नाव न जोडल्यानं त्यांना पुढील अडचणींचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यात वेळ, पैसा आणि श्रम वाया जाऊ शकतात. तुम्हाला ऑनलाईन नॉमिनेशन अर्ज भरण्यासाठी त्यापेक्षा अगदी कमी वेळ लागेल हे निश्चित.