नवी दिल्ली : देशात 3D प्रिंटिंगचा वापर आता काही नवखा राहिला नाही. हा प्रयोग अनेक क्षेत्रात करण्यात येत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन अनेक मोठे बदल होत आहे. तसेच मानवी आयुष्य सुखकर करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येत आहे. देशात आता 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिसचा (3D Printed Post Office) श्रीगणेशा झाला आहे. या शहरात हे अत्याधुनिक टपाल कार्यालय दिमाखात उभे ठाकत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिसची उभारणी का करण्यात येत असेल आणि त्याचा उपयोग काय होणार आहे तो? त्याचे फायदे आणि परिणाम लवकरच भारतीयांना दिसून येतील. तसेच देशात अनेक ठिकाणी असा प्रयोग ही राबविण्यात येणार आहे.
या शहरात देखणी इमारत
भारतात बेंगळुरु शहरात देशातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस तयार करण्यात येत आहे. या शहरातील उत्सुर बाजारात ही देखणी इमारत उभी राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिसच्या तंत्रज्ञानाचे जोरदार कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट करत याचे कोडकौतुक केले. या नवीन तंत्रज्ञानामुळे बांधकामाचा वेग वाढतो आणि त्याचा दर्जा ही उच्च राहतो.
देशातील पहिले 3D पोस्ट ऑफिस
बेंगळुरु शहरात हे पहिले 3डी पोस्ट ऑफिस तयार होत आहे. याची निर्मिती लार्सन आणइ ट्रुबो ही कंपनी करत आहे. ही कंपनी सध्या भारतातील अनेक इमारतीच्या निर्मितीसाठी हे तंत्रज्ञान वापरत आहे. 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करणारी ही भारतातील एकमेव कंपनी आहे.
Good to see new avenues of technology being harnessed for this purpose. https://t.co/TWLB63c4dn
— Narendra Modi (@narendramodi) April 12, 2023
इतका येईल खर्च
हे पोस्ट ऑफिस तयार करण्यासाठी 25 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. बेंगळुरु शहरातील उत्सुर बाजारात ही देखणी इमारत तयार होत आहे. या 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बांधकाम खर्चात 25 टक्के कपात होणार आहे. 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ही इमारत झटपट तयार होईल. तसेची ती गुणवत्ताही चांगली असेल. पण कामकाजात कुठलाच फरक दिसणार नाही. सर्वसामान्य पणे जे कामकाज होते, तसेच कामकाज होत राहिल.
3D प्रिंटिंग म्हणजे काय?
3D प्रिंटिंग हे एक कम्युटरद्वारे निर्मित डिझाईन आहे. त्यामुळे लेअर टू लेअर, थ्री डायमेन्शिनल डिझाईन तयार करण्यात येते. Additive Manufacturing वर हे 3D प्रिंटिंग अवलंबून असते. साध्या प्रिटिंग मशीनमध्ये शाई आणि कागदाचा वापर होतो. तर 3D प्रिंटिंगसाठी वस्तूचा आकार, रंग निश्चित करण्यात येतो. त्यानुसार पदार्थ टाकण्यात येतात. 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर खास करुन सुरक्षा आणि एअरोस्पेससाठी करण्यात येतो.
3D प्रिंटिंग का महत्वाचे ?
3D प्रिंटिंगचा उपयोग छोट्या शहरातील औद्योगिक विकासासाठी करण्यात येतो. त्यामुळे लघू, मध्यम उद्योगाच्या विकासाला चालना मिळेल. त्यामुळे वेळेची बचत तर होईलच पण खर्चही वाचेल. तसेच या इमारती पर्यावरणपूरक असतील. वर्ष 2017 मध्ये जागतिक 3D प्रिंटिंग बाजार जवळपास 7.01 दशलक्ष डॉलर होता. तर 2019 मध्ये या तंत्रज्ञानाचा वाटा जवळपास 80 टक्के वाढला आहे.