नवी दिल्ली: तुम्हीही आयकर परताव्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. प्राप्तिकर विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या 1 एप्रिल ते 2 ऑगस्टदरम्यान 21.32 लाख करदात्यांना सुमारे 45,896 कोटी रुपयांचे परतावे जारी केलेत. आयकर विभागाने ट्विट करून याबाबत माहिती दिली. आयटी विभागाने 21.32 वैयक्तिक प्रकरणांमध्ये 13,694 कोटी रुपयांचे परतावे जारी केलेत. त्याचबरोबर 1,19,173 कॉर्पोरेट प्रकरणांमध्ये 32,203 कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आलाय.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) ट्विट करून ही माहिती दिली. ट्विटमध्ये लिहिले आहे की, सीबीडीटीने 1 एप्रिल 2021 ते 02 ऑगस्ट 2021 दरम्यान 21.32 लाखांहून अधिक करदात्यांना 45,896 कोटी रुपयांचा आयकर परतावा जारी केला. 13,694 कोटी 20,12,802 प्रकरणांमध्ये आणि 32,203 कोटी 1,19,173 कॉर्पोरेट कर प्रकरणांमध्ये जारी करण्यात आलेत.
सीबीडीटीने आयकर कायदा 1961 अंतर्गत विविध फॉर्म इलेक्ट्रॉनिक भरण्याची अंतिम तारीख वाढवली. ही रक्कम करदात्याच्या खात्यावर पाठवण्यात आली. तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे शोधण्यासाठी तुम्ही स्थिती तपासू शकता.
CBDT issues refunds of over Rs. 45,896 crore to more than 21.32 lakh taxpayers between 1st April, 2021 to 02nd August, 2021. Income tax refunds of Rs. 13,694 crore have been issued in 20,12,802 cases & corporate tax refunds of Rs. 32,203 crore have been issued in 1,19,173 cases.
— Income Tax India (@IncomeTaxIndia) August 7, 2021
1. NSDL च्या वेबसाईटवर तपासा-
>> तुम्ही www.incometaxindia.gov.in किंवा www.tin-nsdl.com वर तुमची परताव्याची स्थिती ऑनलाईन तपासू शकता.
>> यापैकी कोणत्याही वेबसाईटवर लॉगिन करा आणि कर परताव्याची स्थिती टॅबवर क्लिक करा.
>> ज्या वर्षासाठी परतावा प्रलंबित आहे, त्या वर्षासाठी तुमचा पॅन नंबर आणि मूल्यांकन वर्ष प्रविष्ट करा.
>> जर विभागाने परताव्याची प्रक्रिया केली असेल तर तुम्हाला पैसे देण्याची पद्धत, संदर्भ क्रमांक, स्थिती आणि परताव्याची तारीख नमूद करणारा मेसेज मिळेल.
>> जर परताव्याची प्रक्रिया केली गेली नसेल किंवा दिली गेली नसेल तर तोच मेसेज येईल.
>> येथे क्लिक करून प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलमध्ये प्रविष्ट करा.
>> परतावा / फॉर्म पाहा.
>> माझे खाते टॅबवर जा आणि आयकर परतावा निवडा.
>> सबमिटवर क्लिक करा.
>> पावती क्रमांकावर क्लिक करा.
>> आयकर परताव्याच्या स्थितीसह आपले विवरण तपशील दर्शविणारे एक पृष्ठ दिसेल.
आर्थिक वर्षात आयकर भरणाऱ्याच्या अंदाजित गुंतवणूक दस्तऐवजाच्या आधारावर आगाऊ रक्कम कापली जाते. परंतु जेव्हा त्याने आर्थिक वर्षाच्या अखेरीस अंतिम कागदपत्रे सादर केली, तर त्याचा कर अधिक कापला गेला आणि त्याला आयकर विभागाकडून पैसे परत हवे असल्यास परताव्यासाठी आयटीआर दाखल करू शकतो.
संबंधित बातम्या
IDBI Bank strategic sale: विक्री व्यवस्थापनाच्या शर्यतीत सात कंपन्या, 10 ऑगस्टला होणार निर्णय
तुम्ही पीएफमधून पैसे काढताय; मग लवकर करा हे काम अन्यथा पैसे अडकणार
45,896 crore refund issued by Income Tax Department, did you get the money in your account or not?