नवी दिल्लीः कमी व्याजदराच्या या काळात मुदत ठेवी अधिक परतावा देण्याचा पर्याय असल्याचे सिद्ध होत नाहीये. परंतु ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा आणि तरलता लक्षात घेता, बचत करण्यासाठी एफडी हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. अशा परिस्थितीत सरकारी आणि खासगी क्षेत्रातील काही बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना सुरू केली होती.
स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँका आहेत. या बँकांनी वरिष्ठ नागरिक विशेष एफडी योजनेचा कालावधी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवला. आयसीआयसीआय बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याच्या विशेष एफडी योजनेची मुदत 07 ऑक्टोबर 2021 पर्यंत वाढवली आहे.
सातत्याने कमी होत असलेला व्याजदर पाहता या बँकांनी गेल्या वर्षीच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना सुरू केली होती. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने या योजनांमध्ये निर्धारित कालावधीपूर्वी 5 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ गुंतवणूक केली तर त्यांना अधिक व्याज मिळण्याची संधी मिळेल.
देशातील सर्वात मोठ्या बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना ठेवलीय. वी केअर – ज्यावर 30 बेसिस पॉइंट म्हणजेच 0.30 टक्के अधिक व्याज उपलब्ध आहे. हे व्याज 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी केलेल्या FD वर उपलब्ध असेल. सध्या SBI आपल्या सामान्य ग्राहकांना 5 वर्षांच्या FD वर 5.40 टक्के दराने व्याज देत आहे. परंतु जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने 5 वर्षांसाठी एफडी केली तर त्याला 6.20 टक्के दराने व्याज मिळेल.
या खासगी क्षेत्रातील बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी या विशेष FD योजनेला ICICI बँक गोल्डन इयर्स FD योजना असे नाव दिले आहे. ICICI बँक या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 0.80 टक्के जास्त व्याजदर देत आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांच्या कालावधीसह FD वर वार्षिक 6.30 टक्के दराने व्याज देत आहे.
एचडीएफसी बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी देऊ केलेल्या या योजनेचे नाव ‘एचडीएफसी सीनियर सिटीझन केअर’ आहे. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेवर 0.75 टक्के जास्त व्याज मिळते. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने एचडीएफसी बँकेत या ऑफरची निवड केली तर त्याला वार्षिक 6.25 टक्के व्याज दर मिळेल.
बँक ऑफ बडोदा आपल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेंतर्गत 100 बेसिस पॉइंट जास्त व्याजदर देत आहे. या योजनेंतर्गत जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने 5 ते 10 वर्षांसाठी एफडी केली, तर त्याला वार्षिक 6.25 टक्के दराने व्याज मिळेल.
संबंधित बातम्या
कधी काळी खिशात 25 पैसे नव्हते, आज 500 कोटींचे मालक, कोण आहेत सांगलीचे अशोक खाडे?
Jan Dhan Account : तब्बल 6 कोटी जनधन अकाऊंट निष्क्रिय, तुमचं खातंही चेक करा!
6.30% interest on FD for people above 60 years, opportunity to avail till this day