नवी दिल्ली: केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्यादृष्टीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या कर्मचाऱ्यांनी लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशनचा (LTC Special Cash Package) लाभ घेतला नव्हता त्यांना सरकारने क्लेम करण्यासाठी आणखी एक संधी देऊ केली आहे. त्यामुळे 31 मे 2021 नंतरचे LTC क्लेमही सरकाकडून विचारात घेतले जाणार आहेत.
कोरोनामुळे LTC Claim ची मुदत वाढवण्यात यावी, अशी अनेक पत्रं आम्हाला मिळाली होती. त्यामुळे एरवी 31 मार्चपर्यंत असलेली मुदत आणखी वाढवण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना गेल्या चार वर्षांपासून LTC सुविधेचा फायदा मिळत आहे. त्यानुसार कर्मचारी वर्षातून एकदा देशभरात कुठेही फिरायला जाऊ शकतात. त्याचे पैसे सरकारकडून कर्मचाऱ्यांना परत दिले जातात. मात्र, यंदा कोरोनामुळे LTC Cash Voucher Scheme चा कालावधी आणखी वाढवण्यात आला आहे.
मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्यादृष्टीने बुधवारी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांच्या वाढीव महागाई भत्ता आणि डियरनेस रिलीफसंदर्भात (DR) महत्वपूर्ण घोषणा होऊ शकते. तसेच जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांतील थकबाकीही दिली जाऊ शकते. तसे झाल्यास सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यामध्ये विशेषत: महागाई भत्त्याबाबत चर्चा होईल. यापूर्वी 26 जूनला कॅबिनेट सचिव आणि अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. त्यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर 2021 पासून महागाई भत्ता पुन्हा लागू करण्याचा निर्णय झाला होता. आता मोदी सरकार त्याला मान्यता देणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 17 टक्के डियरनेस अलाऊन्स (DA) मिळतो. गेल्या तीन हप्त्यामधील वाढ पकडून आता हा DA 28 टक्क्यांवर जाईल. जानेवारी 2020 मध्ये DA 4 टक्क्यांनी वाढला होता. त्यानंतर जुलै 2020 मध्ये तीन टक्क्यांनी तर जानेवारी 2021 मध्ये DA मध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली होती. आता जुलै महिन्यात त्यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होऊ शकते. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण वेतनाच्या 31 टक्के इतका महागाई भत्ता (DA) मिळू शकतो. निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनचा आकडाही याच गणितावर निश्चित होईल.
7th Pay Commission : काय आहे Pay Matrix ज्याने सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार?
7th Pay Commission : सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना जुलैपासून वाढीव वेतन! काय फायदा होणार?