7th Pay Commission: सणांच्या आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, थेट 30 हजारांपर्यंत पगार वाढणार

| Updated on: Jul 07, 2021 | 3:58 PM

कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदती (DR)मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 हजारांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे.

7th Pay Commission: सणांच्या आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, थेट 30 हजारांपर्यंत पगार वाढणार
money
Follow us on

नवी दिल्लीः गणपती आणि दिवाळीसारखे सण सुरू होण्यापूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदती (DR)मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारात 30 हजारांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे. (7th Pay Commission Hike In Dearness Allowance Can Increase Monthly Salary Of Employees Up To 30000)

सद्यस्थितीत डीए 17 टक्क्यांच्या हिशेबानं दिला जातोय. तो 30 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालानुसार डीए / डीआरवर केंद्र सरकार आर्थिक वर्ष 2022 मध्ये डीए / डीआर दरवाढीच्या एकूण बजेटवर सुमारे 30,000 कोटी रुपये खर्च करू शकते. त्याचबरोबर राज्यांमध्येही या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी सुमारे 60,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

दसऱ्यापूर्वी पैसे मिळणार

एक जुलैपासून वाढीव पैसे दसऱ्याच्या (15 ऑक्टोबर) आधी दोन-तीन महिन्यांच्या थकबाकीसह मिळतील, जेणेकरून कर्मचार्‍यांना वाढीव पगाराचा लाभ मिळेल. सातव्या वेतन आयोगांतर्गत नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएम (JCM)चे सचिव शिवगोपाल मिश्रा यांच्या मते केंद्रीय कर्मचार्‍यांना सध्या 17 टक्के महागाई भत्ता मिळतो. शेवटच्या तीन हप्त्यांचे डीए भाडे पूर्ववत होणार आहे. मग ते थेट 28% होईल. यात जानेवारी 2020 मध्ये डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली, त्यानंतर दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच जुलै 2020 मध्ये 3 टक्क्यांनी वाढ झालीय आणि आता जानेवारी 2021 मध्ये ती 4 टक्क्यांनी वाढलीय. जुलै 2021 मध्ये पुन्हा त्यात वाढ होण्याचे संकेत दिलेत. यासंदर्भात महागाई भत्ता 30 ते 31 टक्क्यांपर्यंत वाढू शकेल.

कोरोनामुळे लागला होता ब्रेक

कोरोनाच्या उद्रेकानंतर वित्तीय तणाव कमी करण्यासाठी जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीत केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या डीए आणि पेन्शनर्सच्या डीआरमध्ये वाढ थांबविण्यात आली होती. यासह 2021 आर्थिक वर्षात 25,000 कोटी रुपयांची बचत होईल, असे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

सार्वजनिक उद्योग विभागाबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या आता नेमके काय होणार

HDFC बँकेवर मोठी कारवाई; NHB ने ठोठावला लाखो रुपयांचा दंड

7th Pay Commission Hike In Dearness Allowance Can Increase Monthly Salary Of Employees Up To 30000