नवी दिल्लीः सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक आनंदाची बातमी आहे. फक्त दिवाळी बोनसच मिळालेला नव्हे, तर डीए आणि टीएही वाढलेत. महागाई भत्त्याची पूर्वीची थकबाकीही जोडून देण्यात आलीय. अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी अनेक फायदे मिळत आहेत. महागाई भत्ता म्हणजेच डीए वाढवण्याव्यतिरिक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झालीय, ज्याचा फायदा त्यांना जानेवारीपासून होणार आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आलीय. ही वाढ हाऊस रेंट अलाउंस (HRA) मध्ये केली जाईल, ज्यामुळे पगार देखील वाढेल.
अहवालात पुढे म्हटले आहे की, यासंदर्भात गृह भाडे भत्ता (HRA) लागू करण्याच्या 11.56 लाख कर्मचार्यांच्या मागणीवर अर्थ मंत्रालयाने आधीच विचारमंथन सुरू केलेय. विशेष म्हणजे हा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलाय. त्याचबरोबर या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना जानेवारी 2021 पासून एचआरए मिळेल. एचआरए मिळताच या कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे. इंडियन रेल्वे टेक्निकल पर्यवेक्षक संघटना (IRTSA) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ रेल्वेमेन (NFIR) यांनी 1 जानेवारी 2021 पासून HRA लागू करण्याची मागणी केलीय.
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ झाल्याने त्यांचा घरभाडे भत्ता (एचआरए) आणि वाहतूक भत्ता (टीए) वाढेल. या दोन्ही बाबी पगारात भर घालतात, त्यामुळे आधीच मिळालेला पगार आणखी वाढेल. याशिवाय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही मिळालाय. यामुळे त्यांना एकाच वेळी दोन्ही प्रकारचे फायदे मिळत आहेत. 7व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) वेतन मॅट्रिक्सप्रमाणे, प्रत्येक स्तरावरील कर्मचार्यांचा DA आणि HRA वाढल्याने त्यांचा पगार वाढतो. सातव्या वेतन आयोगाने आपल्या शिफारशीत यापूर्वी प्रस्तावित केले होते की, जेव्हा डीए 25 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तेव्हा एचआरए देखील वाढेल आणि दर 8, 16, 24 टक्क्यांवरून 9, 18 आणि 27 टक्क्यांपर्यंत वाढेल.
ते एका उदाहरणाने समजून घेता येईल. जर एखाद्याचा मूळ पगार 30,000 रुपये असेल, तर त्याला दरमहा सुमारे 5400 ते 8100 रुपयांचा लाभ मिळेल. ताज्या अपडेटनुसार, घरभाडे भत्ता दरमहा किमान 5400 रुपये निश्चित करण्यात आलाय, जो यापेक्षा कमी असू शकत नाही. एचआरए हा पगाराचा केवळ एक भाग आहे, जो एखाद्या कंपनीकडून त्या शहरातील राहण्याचा खर्च लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना दिला जातो. कंपनी त्याची पगार रचना, पगाराची रक्कम आणि कर्मचारी ज्या शहरात राहतो, अशा पॅरामीटर्सच्या आधारावर HRA रक्कम अदा करायची ठरवते. शहर महाग असेल तर एचआरए जास्त असेल, शहर स्वस्त असेल तर एचआरए कमी असेल. HRA वाढवण्यामागील कारण म्हणजे कर्मचाऱ्यांना खर्चात दिलासा देणे आहे.
संबंधित बातम्या
PF चे व्याज खात्यात आले नाही, अशी करा तक्रार, मिस्ड कॉल द्या किंवा SMS द्वारे 1 मिनिटात तपासा
PPF Account Merge: तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती आहेत का? असे करा विलीन