करोडपती बनवणारा शेअर! 10,000% पेक्षा जास्त रिटर्न, कधी 2 रुपयांपेक्षाही कमी होती किंमत, वर्षभरातच…

| Updated on: Dec 22, 2024 | 4:32 PM

Aayush Wellness Ltd Share Price: आयुष वेलनेस लिमिटेडच्या शेअरमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार कोट्यधीश झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत या शेअरने 10,000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिले आहे. पाच वर्षांपूर्वी त्याची किंमत 1.94 होती. म्हणजेच पाच वर्षांत त्याने 10,374 टक्के रिटर्न दिले आहे.

करोडपती बनवणारा शेअर! 10,000% पेक्षा जास्त रिटर्न, कधी 2 रुपयांपेक्षाही कमी होती किंमत, वर्षभरातच...
शेअरमध्ये अपर सर्किट
Follow us on

Aayush Wellness Ltd Share Price: सध्या शेअर बाजारात घसरणीचा पॅटर्न सुरु आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त घसरण झाली. परंतु काही शेअर जबरदस्त रिटर्न देत आहे. त्या शेअरला रोज अपर सर्किट लागत आहे. या मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना खूप कमी कालावधीत मालामाल केले आहे. त्या यादीत आयुष वेलनेस लिमिटेड कंपनीचा शेअर आहे. वर्षभरापूर्वी चार रुपयांवर असणारा हा शेअर शुक्रवारी बाजार बंद असताना 203.20 रुपयांवर पोहचला आहे.

बाजारात घसरण पण शेअर अपर सर्किट

आयुष वेलनेस लिमिटेडने मागील महिन्यात 48 टक्के रिटर्न दिले आहे. शुक्रवारी हा शेअर अपर सर्किटवर होता. एक काळ असा होता या शेअरची किंमत दोन रुपयांपेक्षाही कमी होती. परंतु मागील काही वर्षांत या शेअरने बंपर रिटर्न दिले आहेत. अजूनही हा शेअर जोरदार कामगिरी करत आहे. मागील सहा महिन्यात 566 टक्के रिटर्न या शेअरने दिला आहे.

वर्षभरात 4270 टक्के रिटर्न

सहा महिन्यांपूर्वी आयुष वेलनेस लिमिटेडच्या शेअरमध्ये एखाद्याने एक लाख रुपये गुंतवले असतील तर तो आता त्याचे 6.66 लाख रुपये झाले असतील. म्हणजे त्या व्यक्तीला सहा महिन्यांतच 5.66 लाख रुपये फायदा या शेअरमधून झालेला आहे. वर्षभरापूर्वीचा इतिहास पाहिल्यास हा मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केला आहे. वर्षभरापूर्वी त्याची किंमत 4.65 रुपये होती. आता 203.20 रुपये झाली आहे. म्हणजेच वर्षभरात या शेअरमुळे 4270 टक्के रिटर्न मिळाले आहे. वर्षभरात एका लाखाचे 44 लाख रुपये झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

पाच वर्षांत कोट्यधीश

आयुष वेलनेस लिमिटेडच्या शेअरमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार कोट्यधीश झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत या शेअरने 10,000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिले आहे. पाच वर्षांपूर्वी त्याची किंमत 1.94 होती. म्हणजेच पाच वर्षांत त्याने 10,374 टक्के रिटर्न दिले आहे. म्हणजेच 5 वर्षांपूर्वी ज्याने यामध्ये एक लाख रुपये गुंतवले, त्याचे आज एक कोटीपेक्षा जास्त रुपये झाले आहेत.