WITT 2024 : मोदी सरकारच्या डिजिटल उपक्रमांमुळे भारत एक विकसित देश बनेल, अभय भुतडा यांचे मोठे विधान

| Updated on: Feb 25, 2024 | 6:19 PM

व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या पर्वाला आजपासून सुरूवात झालीये. या कार्यक्रमात अनेक नामांकित लोक हे उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रातील लोक आपले अनुभव शेअर करताना दिसतील. हे सत्र तीन दिवस दिल्लीमध्ये सुरू असणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित असणार आहेत.

WITT 2024 : मोदी सरकारच्या डिजिटल उपक्रमांमुळे भारत एक विकसित देश बनेल, अभय भुतडा यांचे मोठे विधान
Follow us on

दिल्ली : व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचे आता दुसरे पर्व सुरू झाले आहे. आज 25 फेब्रुवारी 2024 पासून या पर्वाला सुरूवात झालीये. हे कॉन्क्लेव आता 27 फेब्रुवारीपर्यंत सुरू असेल. या कॉन्क्लेवमध्ये अनेक नामांकित व्यक्ती या सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे फक्त कोणत्याच एकाच क्षेत्रातील नव्हे तर विविध क्षेत्रातील लोक या कॉन्क्लेवमध्ये सहभागी होतील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील व्हॉट इंडिया थिंक्स टुडेला हजेरी लावणार आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी सर्वांचे स्वागत केले.

पूनावाला फिनकॉर्पचे एमडी अभय भुतडा हे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क TV9 च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’च्या उद्घाटन सत्रात बोलताना दिसले. अभय भुतडा म्हणाले की, मोदी सरकारच्या डिजिटल उपक्रमांमुळे भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्याचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल. सरकारच्या डिजिटल पेमेंट सोल्यूशन्सबद्दल बोलताना देखील अभय भुतडा हे दिसले आहेत.

अभय भुतडा पुढे म्हणाले की, भारत सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाने देशात सर्वसमावेशक क्रांतीने जन्म घेतला आहे. याचा सर्वात मोठा फायदा असा की, भारताला जगात आपले आर्थिक स्थान भक्कम करण्यास मदत मिळून दिली आहे. आता भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. ही मोठी बाब नक्कीच आहे.

अभय भुतडा म्हणाले, अटल इनोव्हेशन मिशनमुळे देशातील उद्योजकता वाढली आहे आणि रोजगार निर्मिती देखील वाढली आहे. मोदी सरकारच्या डिजिटल योजनांमुळे देशाचा विकास होत असल्याचे देखील यावेळी भुतडा यांनी म्हटले आहे. लातूर शहरातील एक उदाहरण सांगताना देखील अभय भुतडा हे दिसले आहेत.

अभय भुतडा म्हणाले, महाराष्ट्रातील एक छोटा जिल्हा लातूर आहे. मी स्वत: लातूरहून आलोय. डिजिटायझेशनच्या मदतीने लातूरसारख्या छोट्या शहरातही लोक राष्ट्र उभारणीशी जोडले जाऊ शकतात. डिजिटायझेशनने सर्वसामान्य लोकांची अनेक अडथळे दूर झाली आहेत. पंतप्रधान जन धन योजना, युपीआय आणि भीम यासारख्या डिजिटल उपक्रमांमुळे देशात पेमेंटच्या दिशेने क्रांती होतंय, असेही अभय भुतडा म्हणाले.