मुंबई | 4 डिसेंबर 2023 : विधानसभा निवडणुकीचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीने नवीन विक्रम केला. सेन्सेक्स ऑल टाईम हायवर पोहचला. चार पैकी तीन राज्यांत भाजपला विजय मिळाल्यानंतर सर्वाधिक फायदा अदानी ग्रुपच्या शेअरला झाले. अदानी ग्रुपमधील एंटरप्राइजेज शेअर सहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. शेअर बाजारात वाढीला निवडणूक निकाल हे एक कारण असले तरी आणखी इतर कारणेही आहे. बाजारातील या वाढीमुळे गुंतवणूकदार मालमाल झाले आहे. प्री ओपनिंग सेशन दरम्यान बाजारात चांगली वाढ दिसत होती. प्री ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 1014.01 वाढला होता.
पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर सोमवारी शेअर बाजार विक्रमासह उघडला. सेन्सेक्स 68,587.82 वर जाऊन पोहचला. सेन्सेक्स ऑल टाइम हायवर गेला असताना निफ्टीसुद्धा 20,602.50 वर गेला. सेन्सेक्समध्ये जवळपास 1000 अंकाची तर निफ्टीमध्ये 300 अंकांची वाढ झाली. बीएसई Sensex 1.31 टक्के वाढीस ओपन झाला. पाच राज्यातील निवडणूक निकालाचा परिणाम दिसला. Adani Group चे शेअर बाजारात तेजीत होते. Adani Enterprises Share 7.04 टक्के म्हणजे 166.30 रुपयांनी वाढले होते. हा शेअर 2,529 वर पोहचला. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअरमध्ये 79.00 म्हणजेच 7.70% वाढ होती.
बाजारात आलेल्या तेजीमुळे मार्केट कॅपिटलमध्ये 4.09 लाख कोटींनी वाढ झाली आहे. BSE वर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅपिटल 4.09 लाख कोटी रुपयांनी वाढून 341.76 लाख कोटींवर गेले आहे. सेन्सेक्समध्ये 30 शेअरपैकी 29 शेअर तेजीत होते. केवळ मारुतिी कंपनीचे शेअरमध्ये घसरण होती. या शेअरमध्ये 0.36% घसरण होती. परंतु अदानी ग्रुपचे सर्व 10 शेअर तेजीत होते.