नवी दिल्ली : अर्थसंकल्पानंतर (Budget 2021) घरेलू शेअर बाजारात रेकॉर्डतोड तेजी दिसून आली. बजेट जाहीर होताच दुसऱ्या दिवशीही शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी मारली आहे. बाजारात सेन्सेक्सने पुन्हा एकदा 50,000 चा आकडा पार केला आहे. सुरुवातीच्या व्यापारात सेन्सेक्स (Sensex) 1403 अंकांनी वाढून 50,004 च्या पातळीवर पोहोचला आहे. यासोबतच निफ्टीनेही (Nifty) 390 गुणांच्या वाढीसह 3,650 पार केले आहेत. यामुळे गुंतवणूकदांरानाही मोठी फायदा झाला आहे. (after budget hike in stock market sensex hits 50000 nifty above 14500 banks)
मिळालेल्या माहितीनुसार, काही मिनिटांत बाजारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. आज बँकांव्यतिरिक्त, वित्तीय, आयटी आणि वाहन क्षेत्र जोरदार खरेदी सुरू आहे.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सही वाढले
ट्रेडिंग दरम्यान, मोठ्या शेअर्समध्ये मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरची जोरदार खरेदी सुरू आहे. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 2.27 टक्क्यांच्या वाढीसह व्यापार करत असून बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकातही 1.76 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. यामुळे या कंपन्यांमध्ये पैसा असणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे.
गुंतवणुकदारांची संपत्ती काही मिनिटांत 4 लाख कोटी रुपयांनी वाढली
बजेटनंतर मार्केटमधील बड्या गुंतवणुकदारांना मोठा फायदा झाला आहे. कारण अवघ्या काही मिनिटांतच त्यांची संपत्ती 4 लाख कोटींपेक्षा जास्त वाढली. अर्थसंकल्पाच्या दिवशी बीएसईच्या सूचीबद्ध कंपन्यांची मार्केट कॅप 1,92,46,713.70 कोटी रुपये होती, जी आजच्या सुरुवातीच्या मार्केटमध्ये 4,29,267.83 कोटी रुपयांनी वाढून 1,96,75,981.53 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. (after budget hike in stock market sensex hits 50000 nifty above 14500 banks)
संबंधिच बातम्या –
बाजार भावापेक्षा 500 रुपयांनी स्वस्त खरेदी करा सोनं, अशी आहे खास योजना
5 लाख लोकांना रोजगार देण्याची रामदेव बाबांची घोषणा, काय आहे प्लॅन वाचा सविस्तर !
Share market Budget 2021: सेन्सेक्समध्ये 2000 पॉईंटसची उसळी; मार्केट कॅप 6 लाख कोटींनी वाढली
Budget 2021 मध्ये खातेधारकांसाठी Good News, बँक बुडाली तर मिळणार 5 लाख रुपय
(after budget hike in stock market sensex hits 50000 nifty above 14500 banks)