मुंबई : मुंबई आणि आसपासच्या भागात पाईपद्वारे गॅसपुरवठा करणार्या कंपनीने सोमवारी नैसर्गिक गॅस (CNG) प्रतिकिलो 1.5 रुपयांनी वाढवला तर घरगुती एलपीजी चा भाव 95 पैसे प्रति घन दराने वाढवला आहे. कोरोनाच्या जीवघेण्या काळात ऑपरेटिंग, कर्मचारी आणि कायमस्वरूपी खर्चाची अंशतः किंमत कमी करण्यासाठी या इंधनांच्या किंमतींमध्ये वाढ केली असल्याची माहिती सरकारी कंपनीने दिली आहे. (after lpg cng and png gas price hike in mumbai by 1 5 rupees per kilo)
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि नजिकच्या सीएनजी आणि PNG चे भाव 49.40 रुपए प्रति किलो ग्रॅम आणि 29.85 रुपए प्रति घनमीटर (स्लॅब1) आणि 35.45 रुपए प्रति घनमीटर (स्लॅब2) झाले आहे. अर्थसंकल्पानंतर देशांतर्गत एलपीजी गॅसच्या किंमतीही वाढवण्यात आल्या आहेत. 25 रुपयांनी याची किंमत वाढवण्यात आली आहे. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसी) च्या वेबसाइटनुसार, 4 फेब्रुवारी 2021 पासून विनाअनुदानित 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर दिल्लीत अनुदानित गॅस सिलेंडरची 14.2 किलो किंमत प्रति सिलेंडर 719 रुपये इतकी झाली आहे. याप्रमाणे मुंबईचा दर 719 रुपये, कोलकाता 745 रुपये आणि चेन्नईचा दर 735 रुपये आहे.
लक्षात असूद्या की, दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किंमती बदलल्या जातात. मागच्या वेळी 1 फेब्रुवारीला विना अनुदानित 14.2 किलो गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, 19 किलो सिलेंडरच्या किंमतीत 191 रुपयांची वाढ करण्यात आली होती. पण यानंतर 4 फेब्रुवारीला घरगुती एलपीजीच्या किंमती पुन्हा वाढवण्यात आल्या होत्या. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.
दरम्यान, जानेवारीत 19 किलो व्यावसायिक सिलेंडर्सच्या किमतीही वाढविण्यात आल्या होत्या. जानेवारीत त्यात 56 रुपयांची वाढ करण्यात आली होती. नोव्हेंबरनंतर डिसेंबरमध्ये दोनदा किमती वाढवल्या गेल्या. नोव्हेंबरमध्ये व्यावसायिक सिलेंडर्सची किंमत 1241.50 रुपये होती. त्याचबरोबर त्याची किंमत 1 डिसेंबर रोजी 1296 रुपये करण्यात आली, तर 15 डिसेंबरला पुन्हा एकदा त्याची किंमत 1332 रुपये करण्यात आली.
महिन्याला किमतीची समिक्षा
भारतात LPG गॅसची किंमत तेल कंपन्या ठरवतात. भारतात जवळपास अधिकाधिक घरांमध्ये LPG कनेक्शन आहेत. या गॅसचा उपयोग खासकरुन स्वयंपाकासाठी केला जातो. LPG गॅसच्या किमतीत झालेली वाढ ही खास करुन सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम करते. कारण सध्यस्थिती वाढलेल्या तेलाचे भाव आणि गॅसच्या किमतीचा फटका हा सर्वसामान्यांना बसतो. दरम्यान, सरकार अनुदानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतं. त्याचबरोबर तेल कंपन्या नव्या योजना चालवून ग्राहकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करतात.
एलपीजी किंमत कशी तपासाल?
एलपीजी सिलेंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या संकेतस्थळावर जावे लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) या संकेतस्थळावर आपण आपल्या शहरातील गॅस सिलेंडरची किंमत तपासू शकता. (after lpg cng and png gas price hike in mumbai by 1 5 rupees per kilo)
संबंधित बातम्या –
Petrol Diesel Price Today: दिल्लीत पेट्रोल 87 रुपये पार; डिझेल खूप महाग; मुंबईत भाव काय?
तुमच्याही गाडीला मिळेल सनरूफ फीचर, स्वस्तात आहे खास ऑफर
(after lpg cng and png gas price hike in mumbai by 1 5 rupees per kilo)