SBI नंतर आता HDFC बँकेची बंपर ऑफर, व्याजदर आणि प्रोसेसिंग फीवर सूट
सोमवारी एसबीआयने वाहन कर्ज, सुवर्ण कर्ज, वैयक्तिक कर्जासाठी प्रक्रिया शुल्क आणि व्याजदरात विशेष सवलत जाहीर केली होती. एचडीएफसीने आज सणासुदीची ऑफर जाहीर केली आहे.
-
-
-
या ऑफरअंतर्गत एचडीएफसी बँक सिक्युरिटीजवरील कर्जासाठी प्रक्रिया शुल्क अर्थात सिक्युरिटीज विरुद्ध कर्ज 750 रुपयांपर्यंत कमी करण्यात आलेय. अशा कर्जाचा व्याजदर 9.90 टक्के असेल. ही ऑफर फक्त 30 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आहे. लोन अगेन्स्ट सिक्युरिटीजअंतर्गत ग्राहक त्याच्या होल्डिंग शेअर्स, म्युच्युअल फंड आणि इतर सिक्युरिटीजवर कर्ज घेऊ शकतो.
-
-
लोन अगेन्स्ट सिक्युरिटीजअंतर्गत कर्जाचे किमान मूल्य 2 लाख रुपये असावे. यामध्ये इक्विटी शेअर्स, म्युच्युअल फंड, एलआयसी पॉलिसी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, गोल्ड डिपॉझिट सर्टिफिकेट, किसान विकास पत्र, नाबार्ड भविष्य निर्माण बाँड आणि नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर अर्थात एनसीडी यांचा समावेश आहे. या कागदपत्रांवर कर्ज घेतले जाऊ शकते.
-
-
आपण या कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास कर्जाची रक्कम लवकरात लवकर दिली जाईल. जर तुम्हाला तुमच्या होल्डिंग शेअरवर कर्ज मिळवायचे असेल तर HDFC नेट बँकिंगमध्ये लॉगिन करा. येथे डीमॅट खात्याचा पर्याय उघडतो. तिथे तुम्हाला लोन अगेन्स्ट सिक्युरिटीजचा पर्याय निवडावा लागेल. आपला अर्ज OTP द्वारे पडताळणी केला जातो. एनएसडीएल आणि सीएसडीएलच्या मदतीने आपले शेअर ऑनलाईन तारण ठेवा. यानंतर तुम्हाला कर्ज वितरीत केले जाईल.
-
-
HDFC ATM transaction Limit : एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या प्लॅटिनम डेबिट कार्डद्वारे बँक दररोज 1 लाख रुपये रोख काढण्याची परवानगी देते. तथापि, इतर कार्डांवर मर्यादा कमी आहे.
-
-
एसबीआयने वैयक्तिक आणि पेन्शन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी सर्व चॅनेलवर प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केलीय. कोविड 19 महामारीविरुद्ध लढाई लढणाऱ्या लोकांसाठी वैयक्तिक कर्जावर 0.50 टक्के विशेष सवलत दिली जाईल, जसे की आरोग्यसेवा कर्मचारी असतील. ही ऑफर लवकरच कार आणि सुवर्ण कर्जासाठी देखील लागू होईल.