मुंबई: कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडियाने आपल्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून कंपनीला झालेला तोटा भरून काढणे शक्य होणार आहे. त्यासाठी एअर इंडिया (Air India) मुंबई आणि दिल्लीतील काही अलिशान मालमत्तांचा लिलाव करणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर तुम्ही या लिलावामध्ये सहभागी होऊ शकता. येत्या 8 आणि 9 जुलैला ऑनलाईन पद्धतीने ही लिलाव प्रक्रिया पार पडेल. (Air India will sale real estate assests in big cities chance to buy afforddable house)
एअर इंडियाकडून देशातील 10 शहरांमधील मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. या माध्यमातून एअर इंडियाला 200 ते 250 कोटी रुपये उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. मनी कंट्रोलच्या माहितीनुसार 13.3 लाखांपासून या मालमत्तांचा लिलाव सुरु होईल.
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत एक रहिवासी प्लॉट आणि एका फ्लॅटची विक्री केली जाणार आहे. तर दिल्लीतील पाच फ्लॅट लिलावासाठी उपलब्ध असतील. बंगुळुरूत एक प्लॉट आणि कोलकातामध्ये 4 फ्लॅट लिलावात विकले जातील. याशिवाय औरंगाबाद येथे एक बुकिंग कार्यालय, स्टाफ क्वार्टर, नाशिकमध्ये सहा फ्लॅट, नागपूरमध्ये एक बुकिंग ऑफिस, भुजमध्ये एअरलाईन हाऊस आणि प्लॉट, तिरुवनंतपुरमध्ये एक प्लॉट आणि मंगळुरूत दोन फ्लॅटसचा लिलाव केला जाईल.
या लिलावात टियर 1 शहरांमध्ये फ्लॅटच्या किंमतीवर 10 टक्क्यांची सूट असेल. कारण याठिकाणी आरक्षित मूल्य कमी करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या:
कर्मचाऱ्यांकडूनच ‘एअर इंडिया’ विकत घेण्याची तयारी; एक-एक लाख रुपयांची वर्गणी
आता हाफ तिकीट विमानप्रवास, एअर इंडियाचं ज्येष्ठ नागरिकांना मोठं गिफ्ट
(Air India will sale real estate assests in big cities chance to buy afforddable house)