मुंबई : गेल्या काही दिवसांपासून जगभरात नोकऱ्यांवर संकट येताना दिसत आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकले. महागाई आणि नोकऱ्यांच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जगभरात सुरू असलेल्या टाळेबंदीच्या लाटेचा परिणाम आता थेट भारतामध्येही परिणाम होताना दिसत आहे. भारताची बजेट एअरलाइन स्पाइसजेटनेही आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामुळे मोठा झटका बसल्याचे बघायला मिळतंय. कंपनी आर्थिक संकटात असल्याने असा निर्णय घेतल्याचे सांगितले जातंय.
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या स्पाइसजेट विमान कंपनीने आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतलाय. स्पाइसजेट कंपनीने खर्च कमी करण्यासाठीच असा निर्णय घेतल्याचे देखील सांगितले जातंय. मात्र, हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळी आल्याचे दिसतंय.
रिपोर्टनुसार, एअरलाइन स्पाइसजेटने तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. म्हणजेच काय तर त्यांनी 15 टक्के इतके कर्मचारी हे कामावरून काढले आहेत. सध्या कंपनीमध्ये नऊ हजारांच्या आसपास कर्मचारी आहेत. एअरलाइन स्पाइसजेटने सध्या 30 च्या आसपास विमाने सुरू आहेत.
1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणे म्हणजेच हा नक्कीच मोठा झटका म्हणावा लागणार आहे. 60 कोटी रुपयांवर कर्मचाऱ्यांच्या पगारीचा खर्च गेल्याने कंपनीला हा निर्णय घ्यावा लागल्याचे देखील सांगितले जातंय. रिपोर्टनुसार टाळेबंदीबाबत कंपनीकडूबन कर्मचाऱ्यांना फोनवरून माहिती ही दिली जातंय.
यापूर्वी एअरलाइन स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना उशीरा पगार मिळत होती. आता तर थेट 1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आलंय. हेच नाही तर जानेवारी महिन्याचा पगार देखील कर्मचाऱ्यांना अजून मिळाला नसल्याचे सांगितले जातंय. आता कंपनी पुढील काही दिवसांमध्ये मोठे काही निर्णय घेऊ शकते असेही सांगितले जातंय.