नवी दिल्लीः आजच्या तारखेमध्ये आधार कार्ड हा आमच्या ओळखीचा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज बनलाय. याशिवाय कोणताही मोठा आर्थिक व्यवहार शक्य नाही. बँक खात्यापासून सरकारी योजनांपर्यंत सर्वत्र आधार कार्ड आवश्यक आहे. आपण सरकारद्वारे प्रदान केलेल्या अनेक फायद्यांपासून वंचित राहू शकता. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना गैरसोय टाळण्यासाठी आधार कार्डशी संबंधित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे.
एसबीआयने आपल्या लाखो ग्राहकांना त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यास सांगितले. आम्ही आमच्या ग्राहकांना सल्ला देतो की, त्यांचे पॅन आधारशी लिंक करा, जेणेकरून कोणतीही गैरसोय होऊ नये आणि कोणत्याही अडचणीशिवाय बँकिंग सेवांचा आनंद घेता येईल, असंही एसबीआयनं सांगितलं.
पॅनला आधारशी जोडण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. जर तुम्ही निर्धारित वेळेत पॅनशी आधार लिंक केले नाही, तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. आयकरने पॅन कार्डला आधारशी जोडणे अनिवार्य केले. सीबीडीटी पॅन कार्ड आधार कार्डाशी जोडण्याची शेवटची तारीख आधी 30 जून होती. पण नंतर ती वाढवण्यात आली. जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही, तर तुम्हाला कलम 234H अंतर्गत जास्तीत जास्त 1,000 रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो. त्यामुळे सर्व बँका आपल्या ग्राहकांना पॅनशी आधार लिंक करण्याचा सल्ला देत आहेत.
We advise our customers to link their PAN with Aadhaar to avoid any inconvenience and continue enjoying a seamless banking service.#ImportantNotice #AadhaarLinking #Pancard #AadhaarCard pic.twitter.com/BccuMZEc2I
— State Bank of India (@TheOfficialSBI) August 19, 2021
आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट incometaxindiaefiling.gov.in उघडा.
येथे तुम्हाला लिंक आधारचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
त्यानंतर खालील बॉक्समध्ये तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव टाका.
कॅप्चा कोड काळजीपूर्वक तपासा आणि बॉक्समध्ये भरा.
सर्व बॉक्स भरल्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा.
तुम्ही SMS द्वारे लिंक देखील करू शकता
तुम्ही एसएमएसद्वारे तुमचे पॅन आधारशी लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या SMS बॉक्समध्ये UIDPN कॅपिटल लेटरमध्ये टाईप करावे लागेल. यानंतर जागा देऊन तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाईप करा आणि नंतर जागा देऊन 10 अंकी पॅन नंबर टाईप करा. हा एसएमएस 567678 किंवा 56161 वर पाठवा.
संबंधित बातम्या
डी-मार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमानींचा जगातील 100 श्रीमंतांमध्ये समावेश, 1.42 लाख कोटींचे मालक
टाटा स्टील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 270.28 कोटी रुपयांचा बोनस मिळणार
Alert for SBI’s 44 crore customers! Do this work as soon as possible, otherwise you will run out of money