मुंबई : आपण मेहनतीने मिळवलेला पैसा कसा मॅनेज करायचा, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. हातात आलेला पैसा मॅनेज करणे अनेकदा अवघड होते. तुमचा पगार नेमका कुठे खर्च होतो याचा अंदाज तुम्हाला असणे गरजेचे असते. सध्या अनेकांच्या हातात स्मार्टफोन असल्याने तुमचे हे काम अगदी सोपे होते. यासाठी फक्त तुमच्या मोबाईलमध्ये काही ठराविक ॲप असणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया असे कोणते मोबाईल ॲप्स आहेत, जे तुमच्या स्मार्टफोनमध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. (All People Must Have these Finance Application to Manage Your Money)
?भीम (BHIM)
भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजे BHIM ॲप. हे ॲप युनिफाईड पेमेंट इंटरफेसवर आधारित असते. याद्वारे तुम्ही डिजीटल स्वरुपात व्यवहार करु शकता. हे ॲप भारतातील सर्व बँकांच्या युपीआयशी जोडलेले आहे.
?एलआईसी कस्टमर(LIC Customer)
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन बीमा निगम (LIC) संदर्भाती बहुतांशी माहिती या ॲपवर उपलब्ध आहे. यात तुम्हाला एलआयसीच्या विविध पॉलिसी, त्याचे ब्रॉशर्स, तसेच एलआयसीचे प्रीमियम कॅल्क्युलेटर, एलआयसी ऑफिस इत्यादींची माहिती सहज मिळू शकते.
?जीएसटी रेट फाइंडर(GST Rate Finder)
जर तुम्हाला वेगवेगळ्या वस्तूंवरील जीएसटी दरांबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल तर ती या ॲपद्वारे तुम्हाला मिळू शकते. तसेच एखाद्या वस्तू आणि सेवांवर किती जीएसटी आकारला गेला पाहिजे याचेही तपशील तुम्हाला या ठिकाणी सहज मिळू शकतात.
?आयकर सेतू (Aaykar Setu)
आयकर सेतू ॲपद्वारे तुम्हाला इन्कम टॅक्ससंदर्भात विविध सेवांचा लाभ घेता येऊ शकतो. यात ऑनलाईन कर भरणे, कर कॅल्क्युलेटर, ऑनलाईन पॅनकार्ड यासारख्या सुविधांचा लाभ मिळू शकतो.
? उमंग (UMANG)
विविध सरकारी कामांसाठी Unified Mobile Application For New-Age Governance म्हणजे UMANG ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. हे ॲप्लिकेशन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तयार केले आहे. या अर्जाद्वारे केंद्र सरकार, स्थानिक संस्था, राज्य सरकारच्या सेवा मोबाईलच्या माध्यमातून वापरता येतील. या ॲप्लिकेशनमध्ये बरेच प्रकार आहेत. शेतकरी, सामाजिक सुरक्षा, विद्यार्थी, महिला व मुले, युवा, प्रमाणपत्रे, शिक्षण, वित्त, आरोग्य, पोलिस, सार्वजनिक, रेशनकार्ड, सामाजिक न्याय, पर्यटन, वाहतूक, उपयुक्तता, सामान्य यासारख्या विविध सेवांचा लाभ तुम्हाला घेता येऊ शकतो.
?एम आधार(mAdhaar)
सध्याच्या सगळ्या महत्त्वाच्या व्यवहारांमध्ये आधार कार्ड (Aadhaar Card)आवश्यक आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) चे mAadhaar हे ॲप चांगलेच सोयीचे आहे. सध्या डिजीटलायझेशन लक्षात घेता सरकारनेही नागरिकांच्या सोयीसाठी mAadhaar हा ॲपची सुविधा केली आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला कागदी ‘आधार कार्ड’ वापरण्याची किंवा सोबत बाळगण्याची गरजच भासणार नाही.
या ॲपचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कोणताही आधार कार्ड युजर्स eKYC माहिती कधीही, कुठेही आणि कोणासोबतची शेअर करु शकतो. तसेच या ॲपद्वारे कोणताही युजर्स त्याचा बायॉमेट्रीक डेटा ब्लॉक करु शकतो. (All People Must Have these Finance Application to Manage Your Money)
बँक ग्राहकांना झटका, ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल, नवे नियम काय?https://t.co/sua0AgOOgA #Banks #RBI #ATM
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 11, 2021
संबंधित बातम्या :
सरकारी कर्मचारी मालामाल, 1 जुलैपासून मोठी पगारवाढ, महिन्याचा पगार किती हजारांनी वाढणार?
Personal Loan घेताय, मग ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, जाणून घ्या संपूर्ण माहिती