स्टॉक आणि शेअरमध्ये असते अंतर, गुंतवणूकीपूर्वी टाका नजर

| Updated on: Nov 04, 2023 | 6:26 PM

Stock And Share | शेअर बाजारात गुंतवणूक करताना स्टॉक आणि शेअर हे दोन शब्द सतत कानावर आदळतात. आपल्याला हे दोन्ही शब्द नामसाधर्म्यामुळे एकच असल्याचे वाटते. तर काहींना एक इंग्रजी तर दुसरा मराठी अथवा हिंदी शब्द वाटतो. शेअर बाजारातील अबकड शिकताना असा गोंधळ उडतो. या दोघांमध्ये काय आहे फरक?

स्टॉक आणि शेअरमध्ये असते अंतर, गुंतवणूकीपूर्वी टाका नजर
Follow us on

नवी दिल्ली | 4 नोव्हेंबर 2023 : शेअर बाजार अनेकांसाठी आकर्षण आहे. अनेकांना झटपट श्रीमंतीचा मार्ग वाटतो. तर काही जण अभ्यासपूर्वक या मैदानात उतरतात. धोरण आखून कमाई करतात. प्रत्येकवेळी कमाई होतेच असे नाही. काहीवेळा अंदाज पण चुकतो. शेअर बाजाराची एबीसीडी शिकताना अनेक गोष्टी पहिल्यांदा माहिती होतात. अनेकांना स्टॉक आणि शेअर हे शब्द नामसाधर्म्यामुळे एकच आहे , असे वाटते. नावातील सारखे पणामुळे हा गोंधळ होतो. दोघांमध्ये अंतर आहे. स्टॉक आणि शेअर यांच्यामध्ये फरक आहे. बाजारात सातत्यपूर्ण असल्यावर हा संभ्रम पण दूर होतो. जाणून घ्या स्टॉक म्हणजे काय आणि काय आहेत शेअर…

शेअर म्हणजे काय

कोणतीही कंपनी स्टॉकचे लहान लहान रुपात हिस्सा करते. स्टॉकचे हे वाटे, हिस्से, तुकडे यांना कंपनीचे शेअर म्हणतात. कंपनीचा प्रत्येक शेअर त्या कंपनीचा त्या वाट्यापुरती मालकी दर्शवतो. समजा एका कंपनीचे एक लाख शेअर आहे. एका गुंतवणूकदाराने त्यातील 100 शेअरची खरेदी केली. तर त्याचा त्या कंपनीत 0.1 टक्के इतका हिस्सा आहे. कोणत्याही कंपनीचा शेअर त्या कंपनीतील तितकी युनिट वाटा, हिस्सा दर्शविते.

हे सुद्धा वाचा

काय असतो स्टॉक

कोणत्याही कंपनीचा स्टॉक हा त्या कंपनीची मालकी दर्शवतो. जेव्हा पण एखादी कंपनी शेअर बाजारात पैसा जमा करण्यासाठी येते. तेव्हा ही कंपनी तीचे स्टॉक अगोदर शेअर बाजारात विकते. या स्टॉकचे लहान लहान हिस्से करण्यात येतात, त्याला शेअर असे म्हणतात.

सोमवारी कसा राहिल बाजार

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात विक्री सत्र आरंभले होते. कदाचित दिवाळीत हे सत्र थांबू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गेल्या दोन महिन्यात एफआयआयने मोठ्या प्रमाणात विक्री केली. परदेशी पाहुणे कदाचित नोव्हेंबर महिन्यात या विक्रीला ब्रेक लावतील. त्यामुळे शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये तेजीचे सत्र आले होते.

खरेदीचे येईल सत्र

अमेरिकेतील आणि जागतिक घडामोडी भारतीय शेअर बाजाराच्या पथ्यावर पडू शकतात. नोव्हेंबरच्या तीन दिवसात परदेशी गुंतवणूकदारांनी कॅश मार्केटमध्ये 3.063 कोटी रुपयांची इक्विटीची विक्री केली. पण कदाचित हे सत्र थांबू शकते. या काळात बँकिंग, ऑटोमोबाईल, आयटी, रिअल इस्टेट ही क्षेत्रे चांगली कामगिरी बजावण्याची शक्यता आहे. तर लार्ज कॅप कंपन्या चांगला नफा झाल्याने वार्षिक आधारावर या क्षेत्रात 40 टक्के वृद्धीचे संकेत मिळत आहे.