नवी दिल्ली : भारतामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. दिवाळीपूर्वी पेट्रोलने शंभरी पार केली होती. परंतु त्यानंतर केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. उत्पादन शुल्क कमी झाल्याने पेट्रोल प्रति लिटर 5 रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले. मात्र अद्यापही पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरच्या आसपास आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यास त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेलवर होतो. कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रीत करण्यासाठी अमेरिका महत्त्वपूर्ण पाऊल उचणार आहे. त्याचा फायदा भारतासोबतच इतर देशांना देखील होऊ शकतो.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 85 डॉलरवर पोहोचले आहेत. त्याचा फटका अमेरिकेला बसत आहे. कच्च्या तेलाचे दर नियंत्रीत करण्यासाठी बायडन सरकार नवी रणनिती आखण्याच्या तयारीत आहे. नव्या रणनितीनुसार अमेरिकन सरकार एडमिनिस्ट्रेशन यूएस स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह (SPR) लागू करू शकते. एसपीआर लागू झाल्यास कच्च्या तेलाचे दर नियंत्रणात येतील. त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा भारता सारख्या देशांना होणार असून, त्यामुळे इंधनाच्या किमती काही प्रमाणात कमी होतील.
1975 साली एसपीआर अर्थात एडमिनिस्ट्रेशन यूएस स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह धोरणाची निर्मिती करण्यात आली होती. युद्ध व आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये इंधनाचे दर नियंत्रीत राहावेत यासाठी हे धोरण आखण्यात आले होते. आखाती देशांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने अमेरिकन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता, तेव्हा देखील एसपीआरचा वापर अमेरिकेकडून करण्यात आला होता. तसेच मॅक्सिकोच्या खाडीमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले होते. तेव्हा देखील कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या होता. त्यावेळी सुद्धा अमेरिकेने एसपीआरचा वापर करून कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रीत केल्या होत्या. थोडक्यात एसपीआर अतर्गंत कच्च्या तेलाचे उत्पादन हे मागणीपेक्षा जास्त वाढवले जाते, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहातात. याचा फायदा भारतासोबत कच्च्या तेलासाठी इतर देशांवर अवलंबून असणाऱ्या इतर देशांना देखील होणार आहे.
ऑनलाईन विमा खरेदीला पंसती; वर्षभरात ग्राहकांची संख्या दुपटीने वाढलीhttps://t.co/sF9lKLFBj2#consumer #insurance #Onlineinsurancepurchase #onlineinsurance
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 19, 2021
संबंधित बातम्या
आरोग्य विम्याचा क्लेम मिळाला नाही तर ‘येथे’ करू शकता तक्रार, जाणून घ्या सर्व काही़
पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 3 योजनांमध्ये करा गुंतवणूक, एफडीपेक्षा अधिक व्याज मिळेल
फक्त 500 रुपयांमध्ये तुम्ही उघडू शकता ‘हे’ खाते, चांगल्या परताव्यासह सुरक्षेचा लाभही मिळेल