पाचवी पास व्यक्तीकडे अमिताभ बच्चन यांची कार, भंगाराच्या व्यवसायातून कोट्यधीश

| Updated on: Nov 01, 2024 | 4:31 PM

Amitabh Bachchan Favourite Car: अभिताभ बच्चन यांच्याकडून ही कार घेतल्यानंतर युसूफ शरीफ यांनी बंगळूरमध्ये तिचा वापर सुरु केला. एकदा वाहतूक पोलिसांनी ही कार पकडली. त्यावेळीपर्यंत ही कार अमिताभ बच्चन यांच्या नावावर होती. तसेच कारची विमा पॉलीसी आणि पोल्यूशन सर्टिफिकेट नव्हते.

पाचवी पास व्यक्तीकडे अमिताभ बच्चन यांची कार, भंगाराच्या व्यवसायातून कोट्यधीश
अमिताभ बच्चन यांच्याकडून युसूफ शरीफ यांनी घेतली कार.
Follow us on

Amitabh Bachchan Favourite Car: बंगळूरमधील गुजरी बाबू किंवा केजीएफ नावाने ओळखले जाणारे व्यक्ती म्हणजे युसूफ शरीफ. उद्योग अन् राजकीय क्षेत्रात ते प्रसिद्ध नाव आहे. स्क्रॅप बिझनेसमधून (भंगार) कोट्यधीश झालेले युसूफ शरीफ यांच्याकडे लक्झरी कारचे कलेक्शन आहे. त्यांच्याकडे अशा कारचे कलेक्शन आहे, ज्यावरुन नजरही हटणार नाही.बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याकडे कधीकाळी असलेली प्रसिद्ध रोल्स-रॉयस फँटम कारसुद्धा युसूफ शरीफ यांच्याकडे आहे.

अनेक गाड्यांचे कलेक्शन

केवळ पाचवी पास असलेले युसूफ शरीफ यांच्याकडे रोल्स-रॉयस फँटम, बीएमडब्ल्यू 5-सीरीज, ऑडी ए 8, ऑडी क्यू7, टोयोटा वेलफायर, बेंटले मुलसाने, मर्सिडीज-बेंज एस-क्लास, फेरारी, एस्टन मार्टिन आणि ऑडी आर8 यासारख्या लग्झरी आणि सुपरकार आहेत. या सर्वांमध्ये चर्चेतील कार रोल्स-रॉयस फँटम आहे. ही कार कधीकाळी अमिताभ बच्चन यांची शान होती. अमिताभ बच्चन यांना ही कार ‘एकलव्य’ चित्रपटाचे निर्देशक विधू विनोद चोपडा यांनी भेट दिली होती.

हे सुद्धा वाचा

वाहतूक पोलिसांनी पकडली कार

अभिताभ बच्चन यांच्याकडून ही कार घेतल्यानंतर युसूफ शरीफ यांनी बंगळूरमध्ये तिचा वापर सुरु केला. एकदा वाहतूक पोलिसांनी ही कार पकडली. त्यावेळीपर्यंत ही कार अमिताभ बच्चन यांच्या नावावर होती. तसेच कारची विमा पॉलीसी आणि पोल्यूशन सर्टिफिकेट नव्हते. त्यामुळे कार जप्त केली. अखेर युसूफ यांनी 5,500 रुपये दंड भरुन कार सोडवून घेतली. अमिताभ बच्चनकडे असलेली रोल्स रॉयस 2007 मध्ये 3.5 कोटीत घेतली होती.

सर्व कार नवीन आहेत की जुन्या

युसूफ शरीफ यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले. परंतु त्यांचे कार कलेक्शन कोट्यवधीच्या स्टाइलने झाले. त्यांच्याकडे असलेली रोल्स-रॉयस फँटम कारची किंमत 8.99 कोटी ते 10.48 कोटी आहे. युसूफ शरीफ यांनी सर्व कार नवीन घेतल्या की सेकंड हँड याबाबत वाद आहे. लोक म्हणतात, रोल्स रॉयस त्यांनी जुनी विकत घेतली आहे. तसेच इतर गाड्याही जुन्या घेतल्या आहेत. कारण जुन्या गाड्या खूप कमी किंमतीत मिळून जातात.