Crorepati Stock : या शेअरने केले करोडपती, गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई, अमिताभ बच्चन यांचीही गुंतवणूक..

| Updated on: Dec 06, 2022 | 5:42 PM

Amitabh Bachchan Crorepati Stock : या स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले, तुम्ही केली का गुंतवणूक?

Crorepati Stock : या शेअरने केले करोडपती, गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई, अमिताभ बच्चन यांचीही गुंतवणूक..
जोरदार परतावा
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : बॉलीवुडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 80 व्या वर्षी सक्रीय आहेत. टीव्ही आणि सिनेमांसोबतच शेअर बाजारातूनही (Share Market) जोरदार कमाई करत आहेत. शेअर बाजारात त्यांनी केलेली गुंतवणूक (Share Market Investment) जोरदार परतावा देत आहे. गेल्या 6 वर्षांपासून ते स्मॉलकॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यातून त्यांना चांगला फायदा मिळाला आहे.

डीपी वायर्स (DP Wires) हे या स्मॉलकॅप शेअरचे नाव आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी 2017 मध्ये ही कंपनी शेअर बाजारात सुचीबद्ध (Listing) होत असताना गुंतवणूक केली होती. त्यानंतर या शेअर 5 पट्टीत जास्त परतावा दिला आहे. त्याचा गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे.

सप्टेंबरच्या शेवटी, 5 अक्टूबर, 2017 रोजी NSE मध्ये हा शेअर सूचीबद्ध झाला. त्यावेळी या शेअरमध्ये अमिताभ बच्चन यांचा वाटा 2.45% होता. त्यांनी 13,41,18,400 शेअर्सची खरेदी केली होती. SME स्टॉक नंतर 17 जानेवारी 2022 रोजी मेनबोर्डवर हलविण्यात आला.

हे सुद्धा वाचा

IPO दरम्यान, हा शेअर प्रत्येकी 75 रुपयांना विक्री होत होता. डीपी वायर्समध्ये बिग बी यांची सध्या 13.4 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. सोमवारी व्यापारात स्टॉक NSE मध्ये 408 रुपये प्रति शेअरवर व्यापार करत होता. सुचीबद्ध झाल्यानंतर या स्टॉकने 444 टक्के परतावा दिला आहे.

आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत DP Wires च्या निव्वळ नफ्यात 9.03 कोटी रुपये म्हणजे 51.2 टक्के फायदा झाला. कंपनीने एका वर्षापूर्वी 5.97 कोटींचा निव्वळ नफा कमाविला होता. त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला.

जुलै-सप्टेंबर या कालावधीत कंपनीची निव्वळ विक्री 114.77 टक्के वाढून 283.96 कोटी रुपये झाली. हीच विक्री गेल्या वर्षी 132.22 कोटी रुपये झाली होती. तर EBITDA 42.7 टक्क्यांहून वाढून 13.10 कोटी रुपये झाला.

ट्रेंडलाईनच्या आकड्यानुसार, अमिताभ बच्चन यांच्याकडे फाइनोटेक्स, बिडला पॅसिफिक मेडस्पा आणि न्यूलँड लॅब्स यांचे शेअर होते. 5 डिसेंबर 2022 रोजी डीपी वायर्सचा मार्केट कॅप 550 कोटी रुपये होते. या कंपनीकडे कोणतेही संस्थागत अथवा म्युच्युअल फंड होल्डिंग नाही.