मोठी बातमी… राधिका आणि अनंत अंबानींचा विवाह लंडनला होणार नाही?, कुठे होणार?; टाइम टेबल व्हायरल

| Updated on: May 25, 2024 | 6:27 PM

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे काही दिवसांपूर्वीच अत्यंत खास पद्धतीने गुजरातच्या जामनगरमध्ये प्री वेडिंग फंक्शन पार पडले. या प्री वेडिंग फंक्शनला अनेक बाॅलिवूड स्टार आणि विदेशातूनही लोक पोहचले होते. आता अनंत आणि राधिका यांच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे.

मोठी बातमी... राधिका आणि अनंत अंबानींचा विवाह लंडनला होणार नाही?, कुठे होणार?; टाइम टेबल व्हायरल
Anant Ambani and Radhika Merchant
Follow us on

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लेक अनंत अंबानी याचे काही दिवसांपूर्वीच प्री वेडिंग फंक्शन गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडले. विशेष म्हणजे या प्री वेडिंग फंक्शनला फक्त देशच नाही तर विदेशातूनही प्रसिद्ध व्यक्ती पोहचले. बाॅलिवूडचे मोठे मोठे कलाकार सहकुटुंब या प्री वेडिंग फंक्शनमध्ये सहभागी झाले. फक्त सहभागीच नाही तर स्टेजवर परफॉर्म करताना देखील दिसले. अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. आता यांच्या लग्नाच्या अपडेटकडे सर्वांच्या नजरा या लागल्या आहेत.

अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले. काही दिवसांपूर्वी सतत एक चर्चा होती की, अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांचे लग्न लंडनमध्ये होणार आहे. मात्र, आता यांच्या लग्नाची सविस्तर माहिती पुढे आलीये. अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांचे लग्न लंडन नव्हे तर भारतातच होणार आहे. या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.

विशेष म्हणजे यांच्या लग्नाच्या तारखेबद्दलची मोठा खुलासा करण्यात आलाय. रिपोर्टनुसार राधिका आणि अनंतचे लग्न 10 ते 12 जुलैमध्ये होणार आहे. हे लग्न हिंदू रितीरिवाजानुसार होईल. 10 ते 12 जुलैमध्ये संगीत, हळद आणि मेहंदीचे फंक्शन होतील आणि शेवटी लग्न. फक्त लग्नच नाही तर रिसेप्शनही मुंबईतच होणार आहे. कौटुंबिक विधी त्यांच्या घरीच पार पडतील.

बाकी लग्नाचे जवळपास कार्यक्रम हे मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होतील. दुसरे प्री वेडिंग फंक्शन हे क्रूझ शिपवर होणार आहे, ज्याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. रिपोर्टनुसार हे क्रूझ 28 मेला संध्याकाळी इटलीहून निघेल. 3 दिवसात हे क्रूझ स्वित्झर्लंडला पोहचेल. 300 व्हीआयपी लोकच या क्रूझवर असतील.

यामध्ये सलमान खान, आमिर खान, रणबीर कपूर आणि इतर जगप्रसिद्ध लोक या दुसऱ्या प्री वेडिंगमध्ये सहभागी होतील. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात सहभागी झालेल्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून अत्यंत खास भेटवस्तू मिळणार आहे, जी चांदीपासून तयार करण्यात आलीये. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाकडे संपूर्ण जगाच्या नजरा या लागल्या आहेत.