अनिल अंबानींचे नशीब पालटले, 48 तासांत दुसरी आनंदाची बातमी, या दोन कंपन्यांची कमाल

| Updated on: Nov 17, 2024 | 10:03 AM

Anil Ambani Reliance Infra Q2 Result: अनिल अंबानी यांची मुले जय अनमोल अंबानी आणि जय अंशुल अंबानी यांनी उद्योगात लक्ष घातले आहे. त्यानंतर अनिल अंबानी यांच्या कंपन्यांची परिस्थिती चांगली होत आहे. धाडसी निर्णय, संघर्षाचा सामना करत त्यांनी कंपनीला नफ्यात आणले आहे.

अनिल अंबानींचे नशीब पालटले, 48 तासांत दुसरी आनंदाची बातमी, या दोन कंपन्यांची कमाल
Anil Ambani, mukesh Ambani
Follow us on

Reliance Infra Q2 Result: रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे बंधू अन‍िल अंबानी गेल्या काही वर्षांपासून अडचणीत होते. त्यांच्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या होत्या. परंतु आता त्यांचे नशीब पालटले आहे. अनिल अंबानी यांच्या मुलांनी कमाल केली आहे. यामुळे तोट्यात असणाऱ्या त्यांच्या कंपन्या फायद्यात येत आहे. रिलायन्स पॉवर कंपनीला दुसऱ्या तिमाहीत फायदा झाला आहे. 2878 कोटी रुपये फायद्यात ही कंपनी आली आहे. त्यानंतर अनिल अंबानी यांच्यासाठी दुसरी चांगली बातमी आली आहे. त्यांच्या रिलायन्स इन्फ्रा लिमिटेडनेही दमदार कामगिरी केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा 4,082.53 कोटी रुपये राहिला आहे. या कंपनीची जबाबदारी अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी सांभाळत आहे.

रिलायन्स इन्फ्रा लिमिटेडला मागील वर्षी या महिन्यात तोटा झाला होता. ही कंपनी 294.04 कोटी रुपये तोट्यात होती. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कर्जाची परतफेड आणि कर्ज सेटलमेंटमुळे कंपनीचा फायदा वाढला आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न किरकोळ घसरले आहे. ते 7,345.96 कोटी रुपये झाले. मागील वर्षी याच तिमाहीत 7,373.49 कोटी रुपये होते.

कंपनीचा खर्चही झाला कमी

कंपनीचा खर्च सप्टेंबरच्या तिमाहीत कमी झाला आहे. तो आता 6,450.38 कोटी रुपये राहिला आहे. मागील वर्षी हा खर्च 7,100.66 कोटी रुपये होता. रिलायन्स इंफ्रा कंपनी वीज, रस्ते, मेट्रो रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये सेवा देते. या बातमीनंतर कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा

रिलायन्स पॉवरची दमदार कामगिरी

रिलायन्स पॉवरची कामगिरी चांगली होत आहे. या आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा या कंपनीचा नफा वाढला आहे. यापूर्वी ही कंपनी तोट्यात होती. परंतु आता ती फायद्यात आली आहे. जुलै- सप्टेंबर तिमाहीत या कंपनीला 237.76 रुपये तोटा होता. आता मात्र कंपनी फायद्यात आली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचा इंटीग्रेटेड नेट प्रॉफ‍िट 2,878.15 कोटी रुपये राहिला आहे.

अनिल अंबानी यांची मुले जय अनमोल अंबानी आणि जय अंशुल अंबानी यांनी उद्योगात लक्ष घातले आहे. त्यानंतर अनिल अंबानी यांच्या कंपन्यांची परिस्थिती चांगली होत आहे. धाडसी निर्णय, संघर्षाचा सामना करत त्यांनी कंपनीला नफ्यात आणले आहे.