देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरच्या हातात मोठी डिल लागली आहे. रिलायन्स पॉवरची उपकंपनी रिलायन्स एनयू सनटेक प्रायव्हेटला एक मोठा सोलर आणि बॅटरी स्टोरेज प्रकल्प मिळाला आहे. हा प्रकल्प त्यांना सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिला आहे. यात 930 मेगा वॅटचा सोलर प्लांट आणि 465 मेगा वॅट 1860 मेगा वॅट बॅटरी स्टोरेज सिस्टम (BESS) आहे. रिलायन्स पॉवरने यासंदर्भात घोषणा केली. हा प्रकल्प आशिया वगळता संपूर्ण आशिया खंडासाठी आहे. या प्रोजेक्टमध्ये डिस्कामला कमी किंमतीत वीज उत्पादन करण्यास मदत मिळेल.
रिलायन्स पॉवरने म्हटले की, भारताचा हा सर्वात मोठा सोलर आणि बॅटरी स्टोरेज सिस्टम प्रोजेक्ट आहे.
2000 मेगावॅट इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टम कनेक्टेड सौर ऊर्जा प्रकल्प आणि 1000 मेगा वॅट ऊर्जा साठवणूक प्रकल्पासाठी पाच कंपन्यांनी बोली लावली होती. त्यात रिलायन्स पॉवरला सर्वात मोठा भाग मिळाला आहे. रिलायन्स एनयू सनटेक को 9 डिसेंबर 2024 ला एसईसीआयपासून 930 मेगावॅटचा सोलर एनर्जी कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.
रिलायन्स पॉवरची उपकंपनी रिलायन्स एनयू सनटेक प्रायव्हेट या प्रकल्पांतर्गत दररोज चार तास पीक वीज पुरवठ्याची किंवा डिस्चार्ज कालावधीचे 4 तासांची हमी देईल. एसईसीआय रिलायन्स सोबत 25 वर्षांसाठी वीज खरेदी करार करणार आहे. यातून निर्माण होणारी सौरऊर्जा भारतातील अनेक डिस्कॉम्सना विकली जाणार आहे.
हा प्रोजेक्ट डिस्कॉम्ससाठी दिलासा देणार आहे. सध्या डिस्कॉम्सला पीक आवर्ससाठी पॉवर एक्सचेंजसाठी 10 रुपये प्रती युनिट दराने वीज खरेदी करावी लागते. या प्रकल्पामुळे डिस्कॉम्स स्वस्त आणि सुनिश्चित वीज पुरवठा करण्यात येणार आहे. म्हणजेच तुमच्या घरात संध्याकाळी जास्त वीज पुरवठ्याची गरज असेल तर हा प्रोजेक्ट त्यासाठी अतिरिक्त विजेची साठवणूक केली जाणार आहे. एखादी मोठी बॅटरी जास्त विजेची गरज पडल्यावर वीज देते, त्या पद्धतीने काम चालणार आहे.