अनिल अंबानींचेही नशीब फळफळले, विदेशात लावला मोठा डाव, बनवला असा प्लॅन

| Updated on: Oct 08, 2024 | 3:26 PM

Anil Ambani Reliance: भूतान सरकारची वाणिज्य आणि गुंतवणूक शाखा 'ड्रक होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड' सोबत त्यांची भागीदारी झाली आहे. भूतानमधील अक्षय आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे.

अनिल अंबानींचेही नशीब फळफळले, विदेशात लावला मोठा डाव, बनवला असा प्लॅन
Anil Ambani
Follow us on

Anil Ambani Reliance: रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे बंधू उद्योगपती अनिल अंबानी यांच्या सर्व कंपन्या कर्जात बुडाल्या होत्या. त्यांच्या कंपन्यांनी दिवाळखोरीसुद्धा जाहीर केली होती. परंतु आता अनिल अंबानी यांचे नशिब बदलले आहे. त्यांच्या कंपन्यांचे कर्ज कमी झाले आहे. त्यानंतर शेअर बाजारात त्यांच्या कंपन्यांच्या शेअरच्या किंमती चांगल्याच वाढल्या आहेत. आता त्यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपने भूतानमध्ये मोठ्या डाव खेळला आहे. अनिल अंबानी भूतानमध्ये पॉवर सेक्टरमध्ये उतरत आहे. ते त्या ठिकाणी 1,270 मेगावॅट सोलर आणि हायड्रो पॉवर प्रकल्प उभारणार आहे. त्यासाठी भूतान सरकारसोबत त्यांची डिल झाली आहे.

अक्षय उर्जा क्षेत्रात गुंतवणूक

अनिल अंबानी यांच्या रिलायन्सकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भूतान सरकारची वाणिज्य आणि गुंतवणूक शाखा ‘ड्रक होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड’ सोबत त्यांची भागीदारी झाली आहे. भूतानमधील अक्षय आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे.

रिलायन्स ग्रुप आणि ड्रुक होल्डिंग यांच्यातील भागीदारी ग्रीन एनर्जी उत्पादनावर, विशेषत: सौर आणि हायड्रो पॉवरवर लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच नवीन हरित तंत्रज्ञान देखील शोधले. रिलायन्सने भूतानच्या अक्षय आणि हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी ‘रिलायन्स एंटरप्रायझेस’ ही नवीन कंपनी स्थापन केली आहे. त्याची प्रमोटर कंपनी मुंबईत रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि रिलायन्स पॉवर लिमिटेडची संयुक्त कंपनी आहे.

हे सुद्धा वाचा

दोन वर्षांत 500 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प

रिलायन्स एंटरप्रायझेकडून पुढील दोन वर्षांचा प्लॅन तयार केला आहे. पुढील दोन वर्षांत दोन टप्प्यात 500 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. हा प्लांट भूतानच्या गेलेफू माइंडफुलनेस सिटीमध्ये स्थापित केला जाईल. या भागीदारी अंतर्गत रिलायन्स पॉवर आणि ड्रुक होल्डिंग संयुक्तपणे 770 मेगावॅट चामखर्चू-1 जलविद्युत प्रकल्प विकसित करणार आहेत. अनिल अंबानी यांची रिलायन्स पॉवर लिमिटेडचे अध्यक्ष हरमनजीत सिंह नागी आणि ड्रक होल्डिंग एण्ड इंव्हेस्टमेंट्सचे सीईओ उज्ज्वल दीप दहल यांनी करारावर स्वाक्षरी केली आहे.