अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानी याला सेबीने ठोठावला मोठा दंड

| Updated on: Sep 23, 2024 | 9:42 PM

भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाने अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानी याला रिलायन्स होम फायनान्स प्रकरणात योग्य परिश्रम प्रक्रिया न पाळल्याबद्दल 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासोबतच रिलायन्स हाउसिंग फायनान्सचे मुख्य जोखीम अधिकारी कृष्णन गोपालकृष्णन यांना 15 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानी याला सेबीने ठोठावला मोठा दंड
Follow us on

रिलायन्स होम फायनान्स प्रकरणात सेबीने उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानी यांना मोठा दंड ठोठावला आहे. कॉर्पोरेट कर्ज घेताना नियमांचे योग्य पालन न केल्याने सेबीने ही अनमोल यांना एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच रिलायन्स हाउसिंग फायनान्सचे माजी मुख्य अधिकारी यांना सेबीने 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेबीने या दोघांना ४५ दिवसांत रक्कम भरण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी जीपीसीएलचे कर्ज कोणालाही देण्यास नकार दिला होता. संचालक मंडळाने 11 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या बैठकीत व्यवस्थापनाला GPCL कर्ज जारी न करण्याचे निर्देश दिले होते. गुंतवणूकदारांच्या सूचनेविरुद्ध के अनमोल आणि कृष्णन यांनी 14 फेब्रुवारी 2019 रोजी Acura Productions प्रायव्हेट लिमिटेडला 20 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते.

सेबी काय म्हणाली

याबाबत माहिती देताना सेबीने सांगितले की, अनमोलने कंपनीचा बिगर कार्यकारी संचालक म्हणून कंपनीवर स्वत:चा व्यवसाय चालवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नियमांच्या विरोधात जाणारे निर्णय घेतले, जे कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या भागधारकांच्या हिताचे नव्हते. त्यांनी नैतिक निकष पाळले नाहीत आणि मनमानीपणे वागले.

याशिवाय कंपनीबद्दल सेबीने सांगितले की, त्यांनीही योग्य प्रक्रिया पाळायला हवी होती. कंपनीच्या सर्व भागधारकांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घ्यायला हवा होता, परंतु त्यांनी सामान्य उद्देश कॉर्पोरेट कर्जही पास केले. कृष्णन यांना नियमांची माहिती असल्याचे सेबीने म्हटले आहे. असे असतानाही त्यांनी 20 कोटींचे कर्ज मंजूर केले.

रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या निधीच्या गैरवापराशी संबंधित प्रकरणात सेबीने ऑगस्टमध्ये अनिल अंबानी आणि इतर 24 जणांना सिक्युरिटी मार्केटमधून पाच वर्षांसाठी बंदी घातल्यानंतर हा आदेश आलाय. याशिवाय 25 कोटींचा दंडही ठोठावण्यात आला आहे.