नवी दिल्ली : ऐन दिवाळीआधी (Diwali Festival) सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. घाऊक महागाईचा दर अर्थात होलसेल प्राईज इंडेक्स (WPI) गेल्या महिन्याच्या तुलनेत यंदा घटला आहे. ऑगस्ट महिन्यानंतर सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईचा (Whole Sale Inflation) दर 1.71 टक्क्यांनी कमी झाला आहे. केंद्र सरकाराने घाऊक महागाईचा दर सप्टेंबर महिन्यात किती राहिला होता, याचे आकडे जाहीर केले आहे. हे आकडे सर्वसामान्यांना दिलासा देणारे जरी असले, तरी घाऊक महागाईचा दर हा अपेक्षेपेक्षा जास्तच असल्याचंही जाणकार सांगतात.
सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर 10.41 टक्के असल्याचं समोर आलं. हाच दर ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत कमी आहे. ऑगस्ट महिन्यात घाऊक महागाईचा दर हा 12.41 टक्के इतका नोंदवण्यात आला होता.
Annual rate of inflation based on all India Wholesale Price Index (WPI) eases to 10.7% for September 2022 against 12.41% recorded in August 2022: Govt of India
— ANI (@ANI) October 14, 2022
ऑगस्ट 2022 | सप्टेंबर 2022 | |
---|---|---|
घाऊक महागाई | घाऊक महागाई | |
खाद्यपदार्थांची महागाई | 9.93% | 8.08% |
खाद्य तेल | -0.74% | -7.32% |
प्रायमरी आर्टिकल | 12.93% | 11.73% |
इंधन आणि उर्जा | 33.67% | 32.61% |
उत्पादन | 7.51% | 6.34% |
कोअर WPI | 7.8% | 7% |
मे महिन्यात घाऊक महागाईचा दर हा रेकॉर्डब्रेक स्तरावर पोहोचला होता. मे महिन्यामध्ये 15.88 टक्के इतका दर घाऊक बाजारात नोंदवला गेला होता. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात या पाच टक्क्यांची घट झाली आहे. जूनमध्येही 15 टक्क्यांपर्यंत जास्त दर घाऊक महागाईमध्ये दिसून आला होता.
एकीकडे किरकोळ महागाईचा दर हा पाच महिन्यांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचलेला असताना आता दुसरीकडे घाऊक महागाईत घट होताना पाहायला मिळतेय. यामुळे किरकोळ बाजारातील महागाईदेखील कमी होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. गेल्या काही महिन्यांची आकडेवारी पाहता डबल डिजीटमध्ये असलेलाल घाऊक महागाईचा दर सिंगल डिजिटमध्ये केव्हा येतो, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.