नोकरी गमावण्याची चिंता विसरा ; जॉब इन्शुरन्स घ्या आणि निर्धास्त व्हा 

| Updated on: Jan 22, 2022 | 8:07 AM

नोकरी विमा घेतला नसेल तर कोरोनाच्या या संकट काळात त्याची फार गरज आहे. नोकरी गेली तरी विमा संरक्षण असल्याने काही महिने, दुसरी नोकरी शोधेपर्यंत तुमचा ताण या विमा पॉलिसीमुळे हलका होईल. 

नोकरी गमावण्याची चिंता विसरा ; जॉब इन्शुरन्स घ्या आणि निर्धास्त व्हा 
Insurance-Company
Follow us on

मुंबई : कोरोनाने गेल्या तीन वर्षात खासगी क्षेत्रातील अनेकांच्या नोक-या खाल्या. काही क्षेत्राने बदल करत पुन्हा जोमाने सुरुवात केली असली तरी कोरोनाचे अनेक व्हेरिएंट्स आणि त्यांच्या वार्ता येऊन धडकल्याने नोकरदार वर्गाच्या मनात धडकी भरली आहे. पुन्हा कोरोनाची लाट आली तर कमी पगारात काम करावे लागते की काय, अथवा कामावरुन कमी करतील की काय अशा ना-ना कुशंकाचे मोहळ नोकरी करणा-याच्या मनात उठते. त्यात कर्जाचे हप्ते, ईएमआयचे हप्ते, मुलांचे शाळा शुल्क, किराणा, घरभाडे आणि घरखर्च कसा भागवायचा असे खर्चाचे एकूण प्रश्न आ वासून समोर उभे ठाकतात. त्यात पुरेशी रक्कम गाठीशी नसेल तर ? तर तुम्हाला नोकरी विमा योजना तारु शकते. होय, आता अनेक विमा कंपन्यांनी जॉब इन्शुरन्स (Job Insurance) देण्यास सुरुवात केली आहे. नेमका काय आहे हा विमा जाणून घेऊयात.

काय आहे नोकरी विमा कवच

पॉलिसीबाजार वेबसाईटने (policybazaar) दिलेल्या माहितीनुसार, भारतात, अनेक विमा कंपन्यांनी नोकरी विमा कवच देण्यास सुरुवात केली आहे. मुळ योजनेसोबतच इतर फायदेही तुम्हाला विमा कंपनी देते, त्या सेवेला रायडर लाभ ( rider benefit) म्हणतात. दुर्धर आजार, अपघात यामुळे नोकरी गमवावी लागल्यास अथवा इतर कारणांमुळे नोकरी गेल्यास कंपनी तुमच्या मदतीला धाऊन येते. मोठे वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज याच्या हप्त्याची काही महिने विमा कंपनी परतफेड करते.

या विम्यासाठी कोण आहे पात्र

नोंदणीकृत कंपनीत काम करणारा कर्मचारी

नियमीत वेतन घेणारा कर्मचारी, सॅलराईड परसन

मात्र स्वतः काम करणारा व्यवासायिक याला विमा संरक्षण मिळत नाही

विम्याची वैशिष्ट्ये काय

अचानक काही कारणामुळे नोकरी गेल्यास पुढील काही महिने संबंधित विमा कंपनी अर्थसहाय्य करते

योजनेतील अटीनुसार नोकरी गमावली असेल तरच विमा संरक्षण लागू होते. अन्यथा विम्याचे फायदे मिळत नाही

दुर्धर आजार, मोठा अपघात, दीर्घ आजारपण, कायमचे अपंगत्व आल्यास विमा कंपनी आर्थिक मदत देते

ही स्वतंत्र पॉलिसी नाही. ही पॉलिसी वेगळी घेता येत नाही. मुख्य पॉलिसीमध्ये या सेवेचा अंतर्भाव करता येतो

आरोग्य विमा अथवा गृह विमा घेतला असेल तर तुम्हाला ही विमा पॉलिसी खरेदी करता येते.

अशावेळी तुमचा दावा टिकणार नाही

विमाधारकामुळे त्याचा जॉब गेला असेल, त्याच्या कंपनीतील खराब कामामुळे त्याची नोकरी गेली असेल

अप्रामाणिकपणा, फसवणूक केल्याचे उघड झाल्यानंतर त्याला कामावरुन कमी केले असेल

परिविक्षा (probation) कालावधीत नोकरी गेली असेल

स्वेच्छेने नोकरी सोडली असेल

तात्पुरत्या करारावर काम करत असाल तर

असा करा अर्ज

विमाधारकाची नोकरी गेल्यास त्याला याची माहिती विमा कंपनीला द्यावी लागेल

विमाधारकाला नोकरी गमाविल्याचा पुरावा सादर करावा लागेल

यासाठीची कागदपत्रे कंपनीकडे द्यावी लागतील

कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर विमा कंपनी तुमचा दावा मंजूर करते

कोणती आहेत कागदपत्रे

विमा कंपनीचा क्लेम फॉर्म

नोकरी गमाविल्याचा पुरावा

नोकरीवरुन काढल्याचे पत्र

तुमचे ओळखपत्र

वयासंबंधीचा पुरावा

नोकरी करत होता त्या कंपनीची माहिती

विमा पॉलिसीची कागदपत्रांची सत्यप्रत

इतर आवश्यक कागदपत्रे

इतर बातम्या

शानदार ऑफर! Maruti Suzuki Alto कार अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सची Toyota Hilux भारतात लाँच, फॉर्च्यूनर आणि इनोव्हा क्रिस्टाचा मिक्स अवतार

Mahindra ची Hero Electric सोबत भागीदारी, दरवर्षी 10 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार