Arunjyoti Bio Ventures Ltd: शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरु आहे. परंतु काही मल्टीबॅगर शेअरने गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त परतावा दिला आहे. बाजारात घसरण होत असताना या शेअरला अपर सर्किट लागत आहे. एक शेअर असा आहे की ज्यामध्ये केवळ चार महिन्यांत दुप्पट रक्कम झाली आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार केल्यावर या शेअरमध्ये 12000 टक्के रिटर्न मिळाले आहे. म्हणजेच लाखाचे कोटी झाले आहे. काधीकाळी दोन रुपयांमध्ये मिळणारा हा शेअर आता 190 रुपयांवर पोहचला आहे. शेअरचा वर्षभरातील उच्चांक हा आहे. अरुणज्योती बायो वेंचर्स लिमिटेड कंपनीचा हा शेअर आहे.
मल्टीबॅगर शेअर अरुणज्योती बायो वेंचर्स लिमिटेडने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. शुक्रवारी हा शेअर 5 टक्के अपर सर्किटवर होता. हा शेअर शुक्रवारी 190.10 रुपयांवर पोहचला. कंपनीने नुकतेच या शेअरचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी हा शेअर दहा भागांत विभाजन करणार आहे. अजून शेअरच्या स्प्लिटचा रिकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही. परंतु या निर्णयामुळे शेअरने उच्चांक गाठला आहे.
कंपनीचा शेअर चार महिन्यांत दुप्पट झाला आहे. 20 ऑगस्त रोजी या शेअरची किंमत 93 रुपये होती. आता ती किंमत 190 रुपये आहे. म्हणजेच केवळ चार महिन्यांत शेअरकडून शंभर टक्के परतावा मिळाला आहे. वर्षभराचा विचार केल्यावर या शेअरने 368 टक्के रिटर्न दिले आहे. वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाखांची गुंतवणूक करणाऱ्यांचे आता 4.68 लाख रुपये झाले आहेत. म्हणजेच वर्षभरात 3.68 लाख रुपयांचा फायदा गुंतवणूकदारांना झाला आहे.
पाच वर्षांचा विचार केल्यावर एक लाख गुंतवणूक करणाऱ्यांचे आता एक कोटी झाले आहे. पाच वर्षांपूर्वी या कंपनीचा शेअर 1.59 रुपये होता. तो आता 190 रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे 11856 टक्के रिटर्न या शेअरने दिले आहे.