Aadhar Card Misused News : आधार कार्ड हे देशातील नागरिकांसाठी महत्वपूर्ण दस्ताऐवज झाला आहे. नागरिकांना ओळख पटवून देण्यासाठी आधारकार्ड (Aadhar Card) हे प्रमाण मानण्यात येते. सध्या आधारकार्डचे गैरप्रकार (Misused of Aadhar Card) ही सर्रास वाढले आहेत. त्यामुळे या कार्डची सुरक्षा करणे गरजेचे झाले आहे. पण तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होत असल्याचे तुम्ही कसे ओळखाल? आधार कार्ड भलत्याच कामासाठी दुस-यानेच वापर केला असेल तर त्याची माहिती तुम्हाला कशी मिळणार ? अशा एक ना अनेक प्रश्न तुमच्यासमोर उभे ठाकले असतील तर त्याचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. आधार कार्डचा गैरवापर पाहता, आधार कार्ड कुठे कुठे वापरण्यात येत आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच हा लेखन प्रपंच. ही माहिती मिळवणे सहज शक्य आहे. तुम्ही सहज तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे करण्यात आला याची माहिती मिळवू शकता. या सर्व गोष्टींचा तपशील (Details of Use) तुम्हाला मिळवता येतो. कसा ते पाहुयात.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDA) नागरिकांना त्यांच्या आधार कार्डचा वापर कुठे आणि कसा करण्यात आला याची माहिती देण्याची सोय केली आहे. यूआयडीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावरhttps://uidai.gov.in/ नागरिकांना ही माहिती जाणून घेता येईल. आधार कार्ड वापराचा इत्यंभूत तपशील मिळविता येईल. या संकेतस्थळावर नागरिकांना आधार प्रमाणीकरण हिस्ट्री टूल मिळेल, ज्याद्वारे तुम्ही आधार कार्डचे तपशील तपासू शकता. यात तुम्हाला तुमचे आधार कुठे वापरले गेले आहे हे कळू शकते.
सुरक्षेच्या दृष्टीने यूआयडीएआयने आधार कार्डची फोटोकॉपी देण्याऐवर्जी मास्क्ड केलेले आधार’ वापरण्याचा सल्ला दिला आहे. मास्क केलेल्या आधारमध्ये, आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे 4 अंक दिसतात. https://myaadhaar.uidai.gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोड केले जाऊ शकते. हॉटेल्स किंवा फिल्म हॉलसारख्या परवाना नसलेल्या खासगी संस्थांना आधार कार्डची प्रत ठेवण्याची परवानगी नाही.