Marathi News Business Atm cloning fraud how you can save bank atm card from card cloning
तुमच्या एका चुकीनं रिकामं होईल खातं, अशी होते ATM कार्ड क्लोनिंगमधून चोरी
एटीएम कार्ड हरवलंय? मग त्वरीत करा हे काम
Follow us on
वारंवार बँकिंग क्षेत्रात फसवणुकीचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. यामुळे बँकेकडूनही ग्राहकांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. अशात गेल्या काही दिवसांमध्ये एटीएम कार्ड क्लोनिंगची प्रकरणं घडत आहेत. यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एटीएम कार्ड क्लोन करून ग्राहकांच्या खात्यामधून पैसे लंपास करायचे. अशी फसवणुकीची पद्धत सध्या सुरू आहे.
हे लुटारू एटीम कार्ड क्लोनिंग करत काही मिनिटांत ग्राहकांच्या खात्यामधून लाखो रुपये लंपास करतात याच्या अनेक तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आल्या आहेत. एटीएम क्लोनिंग नेमकं काय आहे जाणून घेऊयात…
एटीएम कार्डला क्लोनिंग करण्यासाठी लुटेरे स्कॅनिंग स्लॉट असणाऱ्या डिव्हाइसचा वापर करतात. हे डिव्हाइस PoS मशिनींसारखं दिसतं, ज्याच्यामुळे कार्ड धारकांना लुटेऱ्यांचा पत्ताही लागत नाही.
फसवणूकीसाठी वापरल्या जाणार्या मशीनमध्ये असं सॉफ्टवेअर असतं ज्यात 3 हजार कार्डाची माहिती साठवली जाऊ शकते. त्यामुळे लुटेरे ग्राहकांच्या क्रेडिट-डेबिट कार्डाद्वारे डिव्हाइसवर स्वाइप करतात आणि मशीनमधील त्यांची माहिती गोळा करतात.
EMV चिप बेस्ड कार्डचा करा वापर – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मॅगस्ट्रिप कार्डऐवजी EMV चिप बेस्ड कार्डचा वापर अनिवार्य केला आहे. EMV कार्डमध्ये असलेली मायक्रोचिप डेटा चोरी होण्यापासून वाचवते.
नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यात 47% घट
आता घरबसल्या करा SBI डेबिट कार्ड पिन जनरेट, या स्टेप्स करा फॉलो
जर तुम्ही एखाद्या हॉटेल, पेट्रोल पंप किंवा इतर ठिकाणी पीओएस मशिनद्वारे कार्ड स्वाईप करत असाल आणि मशीन जर जास्त वजनाची लागत असेल तर तातडीने त्याची तपासणी करा.
तुम्हाला येणाऱ्या मेसेजवर लक्ष ठेवा – कार्डने पेमेंट केल्यानंतर तुम्हाला मोबाइल फोनवर व्यवहार केल्याचा मेसेज नाही आला तर तात्काळ बँकेशी संपर्क साधा. याशिवाय बँकेतून येणारा प्रत्येक मेसेज काळजीपूर्वक वाचा आणि तो तपासा. यासंबंधीची अधिक माहिती तुम्ही बँक स्टेटमेंटमधूनही घेऊ शकता.