नवी दिल्लीः ATM Fraud: जसं जग डिजिटल होत आहे, तशाच फसवणूक आणि ऑनलाईन फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. विशेषत: कोरोना महामारीनंतर फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झालीय. अशा परिस्थितीत सर्व फसवणुकीपासून सावध राहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एटीएम कार्डचे क्लोनिंग करून पैसे चोरूनही फसवणूक केली जातेय.
एटीएम मशीनमध्ये कार्ड क्लोनिंगची प्रकरणे येतच राहतात. अशाच एका प्रकरणात जेव्हा ग्राहक पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनवर गेला, व्यवहाराची संपूर्ण प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरही एटीएम मशीनमधून पैसे बाहेर आले नाहीत. ग्राहकाला संशय आला आणि एटीएम मशीनकडे काळजीपूर्वक पाहू लागला. ज्या ठिकाणी पिन नंबर टाईप केला होता त्या ठिकाणी टेपसह प्लेट चिकटवल्याचे ग्राहकाला आढळले. या प्लेटमध्ये कॅमेरा, एसडी कार्ड आणि बॅटरी होती. अशा उपकरणातून फसवणूक करणारे एटीएम कार्ड क्लोन करतात आणि नंतर कार्डधारकाच्या खात्यातील सर्व पैसे लुटतात.
1. एटीएम मशीनमधून पैसे काढताना कार्डधारकाने मशीनमध्ये कार्ड घालण्याचे स्थान नेहमी तपासावे. ठगांनी त्या ठिकाणी क्लोनिंग यंत्र ठेवले आणि त्या व्यक्तीचे एटीएम कार्ड स्कॅन केले.
2. कार्डधारकाने त्याचा पिन नंबर टाकण्यापूर्वी कीपॅड देखील तपासावा.
3. कार्डधारकाने आपली बोटं कॅमेऱ्याच्या नजरेपासून दूर ठेवावीत किंवा आपला पिन टाकताना कीपॅड दुसऱ्या हाताने झाकून ठेवावा.
4. कार्डधारकाने चुंबकीय कार्डच्या जागी ईएमव्ही चिप आधारित कार्ड वापरावे. यासह जर कार्ड स्कॅन किंवा क्लोन केले असेल, तर फसवणूक करणाऱ्याला एन्क्रिप्टेड माहिती मिळेल, कारण ईएमव्ही कार्डमध्ये मायक्रोचिप असतात.
5. कार्डधारकाने दुकान, हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये कार्ड स्वाईप करण्यापूर्वी POS मशीन तपासावे. मशीन कोणत्या बँकेची आहे ते तपासा. पीओएस मशीनची कंपनीदेखील मशीनचे बिल पाहून निश्चित करता येते. या व्यतिरिक्त स्वाईप क्षेत्र आणि कीपॅड देखील तपासा.
6. कार्डधारकाने शक्य तितके फक्त सार्वजनिक ठिकाणी किंवा एटीएम जेथे गार्ड आहेत, तेथेच एटीएमचा वापर करावा.
7. खरेदी, रिचार्ज किंवा इतर वॉलेटसाठी तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सेव्ह करू नका.
8. जर पीओसी मशीन शॉपिंग मॉलमध्ये ओटीपीशिवाय व्यवहार करत असेल तर बँकेत जा आणि सुरक्षित कार्ड जारी करा, जे केवळ ओटीपीद्वारे व्यवहार पूर्ण करेल.
9. आपल्या कार्डमध्ये पैसे काढण्याची मर्यादा निश्चित ठेवा, जेणेकरून क्लोनिंग किंवा फसवणूक झाल्यास मर्यादित रक्कमच काढता येईल.
जर बँक किंवा मशीनच्या बाजूने व्यवहार यशस्वी झाला आणि तुम्हाला पैसे मिळाले नाहीत, तर तुम्ही ताबडतोब बँकेला कॉल करावा. काही तांत्रिक बिघाड झाल्यास बँकेतून 24 ते 48 तासांत पैसे खात्यात परत जमा होतात. त्याच वेळी तांत्रिक दोष नसल्यास बँक कर्मचारी किंवा पोलीस घटनास्थळी पोहोचतात आणि चौकशी करतात. अशा परिस्थितीत वापरकर्त्याने बँक कर्मचारी किंवा पोलीस येईपर्यंत तिथे राहावे. मशीनमधून पैसे का येत नाहीत हे बँकेकडूनही सांगितले जाते.
संबंधित बातम्या
PNB कडून 50 हजार ते 10 लाखांचे कर्ज, जाणून घ्या कसे आणि कोणाला लाभ?
1 लाख रुपयांत सुरू करा हा व्यवसाय, दरमहा 40000 पेक्षा जास्त फायदा, 80% सरकारची मदत
ATM Fraud: Fraud by cloning ATM card while withdrawing money, know how to avoid it