नवी दिल्लीः बंधन बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात बदल केलाय. बचत वाढवण्यासाठी आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकेने आपले व्याजदर 6 टक्क्यांपर्यंत लागू केलेत. अलीकडच्या काळात व्याजदरात थोडीशी घसरण झाली असताना बंधन बँकेचा बचत व्याजदर सध्या बाजारात सर्वाधिक आहे. भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक सध्या ग्राहकांना बचत खात्यांवर केवळ 2.7 टक्के वार्षिक परतावा देते. त्यानुसार बंधन बँकेचा व्याजदर पै अन् पै जोडून काही नफा मिळवू इच्छिणाऱ्या ठेवीदारांसाठी योग्य आहे.
बंधन बँकेचा नवीन व्याजदर 1 नोव्हेंबर 2021 पासून लागू होणार आहे. 6 टक्के व्याजदर हा बँकेचा सर्वोच्च दर आहे आणि हा नियम सर्व खातेदारांना लागू होणार नाही. दररोज 10 लाख ते 2 कोटी रुपयांदरम्यान किमान शिल्लक असलेल्या घरगुती आणि अनिवासी बचत बँक खात्यांवर 6 टक्के कमाल व्याजदर लागू होणार आहे. दररोज खात्यात किमान 1 लाख रुपये शिल्लक ठेवण्यासाठी 3 टक्के व्याजदर आहे. 1 लाख ते 10 लाख रुपये शिल्लक असलेल्या खात्यांसाठी 5 टक्के व्याजदर आहे. 10 लाख ते 2 कोटी दैनंदिन शिल्लकसाठी व्याजदर 6 टक्के आहे. 2 कोटी ते 10 कोटी रुपयांसाठी हा दर 5 टक्के आहे.
बंधन बँकेला भारतातील ग्राहकांची संख्या वेगाने वाढवायची आहे. बँकेने केवळ ठेवीच नव्हे तर कर्ज पोर्टफोलिओमध्येही लक्षणीय वाढ नोंदवली. मागील वर्षाच्या तिमाही आकडेवारीच्या तुलनेत, बँकेच्या कर्ज पोर्टफोलिओमध्ये 2021-22 या आर्थिक वर्षात 6.6 टक्क्यांची वाढ झाली. बँकेत ठेवलेल्या पैशांच्या बाबतीत वाढ अधिक वेगाने दिसून आली. वर्ष-दर-वर्षाच्या वाढीच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, बंधन बँकेच्या ठेवी या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 2020-21 च्या तत्सम तिमाहीच्या तुलनेत 23.0 टक्क्यांनी वाढल्यात.
बंधन बँकेने 80 लाखांहून अधिक नवीन ग्राहक जोडण्यात यश मिळवले, ज्यामुळे त्यांचा एकूण ग्राहक संख्या 243 दशलक्ष झाली. बंधन बँकेने 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत 3490 कोटी रुपयांच्या EEB पोर्टफोलिओची पुनर्रचना केली आहे, त्याच तिमाहीत नॉन-EEB पोर्टफोलिओ 268 कोटी रुपये आहे. दरम्यान, बँकेचे एकूण एनपीए 10.8 टक्क्यांवर स्थिर राहिले आणि निव्वळ एनपीए 3 टक्क्यांवर नोंदवले गेले.
बचत खात्यातील दिवसाच्या शेवटी शिल्लक असलेल्या रकमेवर आधारित व्याजाची गणना दररोज केली जाईल. 1 लाखांपर्यंतच्या रकमेवर 3% p.a. व्याज लागू आहे. 1 लाख आणि 10 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर वार्षिक 5% व्याज दर निश्चित केला जातो. 10 लाख ते 2 कोटी रुपयांच्या शिल्लक रकमेवर वार्षिक 6% व्याज दिले जाईल. 2 कोटी ते 10 कोटी रुपयांच्या दैनंदिन ठेवींवर 5% व्याजदर आहे. जर एखाद्या व्यक्तीने 10 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर त्याला व्याजदर जाणून घेण्यासाठी बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा लागेल. 30 जून, 30 सप्टेंबर, 31 डिसेंबर आणि 31 मार्चला दर तिमाहीला व्याज दिले जाते.
संबंधित बातम्या
‘या’ बँकेद्वारे HPCL कडून मोठी सुविधा सुरू, आता FASTag द्वारे पेट्रोल, डिझेलचे पैसे भरता येणार
PAN card update: लग्नानंतर पॅनमध्ये आडनाव किंवा पत्ता बदलायचा की नाही, जाणून घ्या प्रक्रिया काय?