बांगलादेशातील संकट भारतासाठी ठरले फायद्याचे, सहा महिन्यांत 60 हजार कोटींची रग्गड कमाई

| Updated on: Oct 21, 2024 | 12:15 PM

india bangladesh relations: बांगलादेशात असलेले स्वस्त मजूर यामुळे त्या देशातील टेक्सटाइल उद्योग जगात सर्वात मोठा उद्योग होता. त्या ठिकाणी तयार झालेले कपडे भारतासह जगात अनेक ठिकणी निर्यात होत होते. परंतु बांगलादेशाला त्याच्या देशातील हिंसक आंदोलनाचा फटका बसला आहे.

बांगलादेशातील संकट भारतासाठी ठरले फायद्याचे, सहा महिन्यांत 60 हजार कोटींची रग्गड कमाई
india bangladesh relations
Follow us on

Bangladesh Textile Industry: बांगलादेशात गेल्या सहा महिन्यांपासून अस्थिरता आहे. बांगलादेशातील विद्यार्थ्यांनी हिंसक आंदोलन केले. त्यानंतर त्या देशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. बांगलादेशाची सूत्र नोबेल विजेता मोहम्मद युनूस यांच्याकडे गेली. परंतु देशातील हिंसाचार आणि अस्थिरता रोखण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे बांगलादेशातील उद्योग अन् व्यापार ठप्प झाला आहे. बांगलादेशातील संकट भारतासाठी फायदेशीर ठरले आहे. भारत जगात आपली छाप सोडत आहेत.

60 हजार कोटी रुपयांची भर

बांगलादेशात असलेले स्वस्त मजूर यामुळे त्या देशातील टेक्सटाइल उद्योग जगात सर्वात मोठा उद्योग होता. त्या ठिकाणी तयार झालेले कपडे भारतासह जगात अनेक ठिकणी निर्यात होत होते. परंतु बांगलादेशाला त्याच्या देशातील हिंसक आंदोलनाचा फटका बसला आहे. त्याचा फायदा भारताला मिळत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, बांगलादेश संकटानंतर भारतीय वस्त्रोद्योगाला गती मिळाली आहे. गेल्या 6 महिन्यांत त्यात 60 हजार कोटी रुपयांची भर पडली आहे. बांगलादेशातील वाढत्या संकटामुळे जगभरातील कपडे खरेदीदार भारताकडे वळत आहेत, त्यामुळे भारताची आयात वाढली आहे.

कापड निर्यात 8.5 टक्क्यांनी वाढली

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जागतिक अनिश्चितता असूनही, चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एप्रिल-सप्टेंबर दरम्यान देशाची कापड निर्यात 8.5 टक्क्यांनी वाढून $7.5 अब्ज म्हणजेच 60 हजार कोटी रुपये झाली आहे. सप्टेंबरमध्येही तयार कपड्यांची निर्यात 17.3 टक्क्यांनी वाढून 1.11 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मागील आकडेवारीनुसार बांगलादेशातून दर महिन्याला 3.5 ते 3.8 अब्ज डॉलर्सचे कपडे निर्यात केले जात होते. बांगलादेशातून युरोपियन युनियनमधून ब्रिटनमध्ये कपडे निर्यात केले जात होते.

हे सुद्धा वाचा

बांगलादेशातील उद्योग भारतात येणार

बांगलादेशच्या संकटाचा थेट फायदा भारताला होत आहे. गेल्या 6 महिन्यांत भारतीय वस्त्रोद्योगाचा खूप फायदा झाला आहे. बांगलादेशातील अस्थिरतेमुळे जगभरातील व्यापारी भारतात आपल्या ऑर्डर्स वाढवत आहेत. तज्ज्ञांच्या मते, या परिस्थितीत भारत याचा फायदा घेऊन आपली निर्यात क्षमता वाढवू शकतो. त्याच वेळी, ज्या भारतीयांचे बांगलादेशमध्ये उत्पादन युनिट आहेत ते देखील त्यांचा व्यवसाय भारतात हलवू शकतात. यामुळे भारताचे उत्पन्न तर वाढेलच शिवाय देशात रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.