Bank Holiday February : फेब्रुवारीमध्ये 8 दिवस असणार बँका बंद, ब्रान्चमध्ये जाण्याआधी चेक करा तारखा

| Updated on: Jan 28, 2021 | 11:29 AM

पुढच्या महिन्यात तुमचा एखादा बँकिंग व्यवहार असेल तर बँक नेमकी कोणत्या तारखांना बंद आहे. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जाणून घेऊयात कोणत्या तारखांना बँका आहे बंद.

Bank Holiday February : फेब्रुवारीमध्ये 8 दिवस असणार बँका बंद, ब्रान्चमध्ये जाण्याआधी चेक करा तारखा
Follow us on

नवी दिल्ली : Bank Holiday February 2021 : नवं वर्ष सुरू झाल्यानंतरचा जानेवारी महिना हा आता संपणार आहे. पुढच्या महिन्यात अनेक आर्थिक बदल होणार असून बँकांसंबंधी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, पुढच्या महिन्यात तुमचा एखादा बँकिंग व्यवहार असेल तर बँक नेमकी कोणत्या तारखांना बंद आहे. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जाणून घेऊयात कोणत्या तारखांना बँका आहे बंद. (Bank Holiday February Banks closed for 8 days in February check dates before visiting branches)

2021 मध्ये बँका 40 दिवस असणार बंद

मार्चमध्ये आर्थिक वर्ष संपेल. 1 फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये किती दिवस बँका राहणार आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) वर्षभराची बँकांच्या सुट्य्यांची यादी केली असता बँका 40 दिवसांपेक्षा जास्त दिवस बंद राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश करण्यात आला आहे. रविवारी वगळता बँका महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात.

12 फेब्रुवारी 2021: शुक्रवार- सोनम लोसार- सिक्किम

13 फेब्रुवारी2021: दूसरा शनिवार

15 फेब्रुवारी 2021: सोमवार- – मणिपुर

16 फेब्रुवारी 2021: मंगळवार- वसंत पंचमी- हरियाणा, उड़ीसा, पंजाब, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल

19 फेब्रुवारी 2021: शुक्रवार- छत्रपति शिवाजी महाराज जयंती – महाराष्ट्र

20 फेब्रुवारी 2021: शनिवार- अरुणाचल आणि मिजोरम

26 फेब्रुवारी 2021: शुक्रवार- हजरत अली जयंती – उत्तर प्रदेश

27 फेब्रुवारी 2021: चौथा शनिवार, गुरू रविदास जयंती- चंडीगड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि पंजाब

इंटरनेट बँकिंगने करू शकता महत्त्वाची कामं

या सगळ्या तारखांना बँक शाखा जरी बंद असल्या तरी इंटरनेट बँकिंगद्वारे तुम्ही अनेक कामं करू शकता. आरबीआयचं म्हणणं आहे की, राज्यांमध्ये बँकांच्या सुट्ट्या बदलू शकतात. म्हणूनच, सर्व ग्राहकांनी हे लक्षात घेऊन बँकिंगशी संबंधित त्यांच्या कामाची योजना आखली पाहिजे. (Bank Holiday February Banks closed for 8 days in February check dates before visiting branches)

संबंधित बातम्या – 

31 जानेवारीपर्यंत फ्रीमध्ये बुक करा सिलेंडर, ‘हा’ आहे प्रोमो कोड

फेब्रुवारी 1 पासून व्यवहारातील या 5 गोष्टी बदलणार, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

मोठी बातमी! 21 हजार रुपयांपर्यंत महिना पगार असणाऱ्यांना 1 एप्रिलपासून जबरदस्त फायदा

(Bank Holiday February Banks closed for 8 days in February check dates before visiting branches)