नवी दिल्ली : देशातली सगळ्यात मोठी सरकारी बँक बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्म (Digital Lending Platform) सुरू केला आहे. यामुळे किरकोळ कर्ज घेणाऱ्यांना सोप्या पद्धतीने पेपरलेस प्रक्रियेद्वारे डिजिटलपणे कर्ज मिळवण्यासाठी मदत होते. सध्या, बीओबी (BoB) निवडक ग्राहकांना प्री-मंजूर मायक्रो पर्सनल लोन देत आहे. या अंतर्गत, ग्राहक ऑफलाइन / ऑनलाइन चॅनेलद्वारे खरेदी करू शकतात आणि नंतर ईएमआयमध्येही पैसे भरू शकतात. (bank of baroda digital lending platform to get home personal car loans approval in 30 minutes)
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक आपल्या बचत खात्यामध्ये असलेल्या रक्कमेचाही फायदा घेऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये 60 सेकंदामध्ये m-Connect+ या मोबाइल अॅपद्वारे 3 ते 18 महिन्यांमध्ये या रक्कमेला EMI मध्ये बदलू शकता.
डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्मचे काय आहेत फीचर्स?
>> डिजिटल लेंडिंग प्लेटफॉर्म मानवी हस्तक्षेपाशिवाय 30 मिनिटांत होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनची ‘In Principle approval’ देतो.
>> बीओबीच्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल कर्ज प्रक्रिया कर्ज अर्जदाराच्या आर्थिक प्रोफाइलच्या माध्यमातून दिलं जातं आणि अर्जदारास 4 सोप्या प्रक्रियेमध्ये ‘इन प्रिन्सिपल मंजूरी’ मिळते.
>> कर्जासाठी कुठे कराल अर्ज? – वेबसाइट, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि सोशल मीडियाद्वारे देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
फिक्स्ड डिपॉजिटवर घ्या ऑनलाईन कर्ज
नवीन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बीओबी ‘ऑनलाईन लोन अगेन्स्ट फिक्स्ड डिपॉझिट’ देण्यात येईल. यामुळे फिक्स्ड डिपॉजिट ग्राहकांना मोबाइल बँकिंग आणि नेट बँकिंग सुविधेद्वारे त्यांच्या ऑनलाइन एफडीवर त्वरित कर्ज मिळण्यास मदत होईल. (bank of baroda digital lending platform to get home personal car loans approval in 30 minutes)
संबंधित बातम्या –
नोकरीवर असताना EPF मधून पैसे काढायचे आहेत? मग जाणून घ्या इत्यंभूत माहिती
कोट्यवधी शेतकरी अर्ज करुनही PM Kisan Scheme पासून वंचित, आता काय करायचं?