नवी दिल्ली: बँक कर्मचाऱ्यांच्या (Bank Workers strike) विविध यूनियनकडून बँकांच्या खासगीकरणाविरोधात (Bank Privatization) 16 आणि 17 डिसेंबरला संप पुकारण्यात आला आहे. या दोन दिवसांच्या देश पातळीवरील संपाच्या काळात बँकांचं कामकाज बंद राहणार आहे. बँक कर्मचाऱ्यांना बँक व्यवस्थापनाकडून संपावर न जाण्याच आवाहन करणयात आलं आहे. बँक कर्मचारी यूनियनने मात्र संपाची भूमिका कायम ठेवली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियानं कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याचं आवाहन केलं आहे. बँकेने कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणू संसर्गाची स्थिती पाहता ग्राहकांच्या हितासाठी संपावर न जाण्याचं आवाहन केलं आहे. एसबीआय कर्मचारी संघटनांना चर्चेच आवाहन केलं आहे. तर, सेंट्रल बँक ऑफ इंडियानं देखील कर्मचारी संघटनांना आपल्या ग्राहकांच्याहितासाठी काम करण्याचं आवाहन केलं आहे. तर, पंजाब नॅशनल बँकेनं कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याचं आवाहन केलं आहे.
An appeal to all Bank Staff. pic.twitter.com/EZFGpfnK0a
— State Bank of India (@TheOfficialSBI) December 13, 2021
विविध माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार बँकांचे प्रमुख, बँक असोसिएशन आणि बँक कर्मचारी यूनियन यांच्यात चर्चा सुरु आहे. बँक व्यवस्थापन सातत्यानं संप रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 2021 च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी बँकांच्या खासगीकरणासंदर्भात बनवलेल्या कमिटीसंदर्भात बोलताना दोन बँकांचं खासगीकरण करणार असल्याचं म्हटलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी लोकसभेत बोलताना 2021-22 या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचं खासगीकरण करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. कोणत्या बँकांचं खासगीकरण करायचं यासंदर्भातील निर्णय देखील बँक खासगीकरण समिती घेणार आहे.
इतर बातम्या:
एसबीआयच्या ‘या’ दोन करंट अकाऊंटवर मिळतात चांगल्या सुविधा; व्यवसायिकांसाठी ऑफर्सची खैरात
Bank Workers call two days nationwide strike against center decision of privatization of banks