दोघांच्या भांडणात बँकांचे कोट्यवधींचे नुकसान… कोण आहेत ते दोन धनाढ्य…

| Updated on: Apr 03, 2022 | 5:29 PM

एकानंतर एक फ्यूचर ग्रुप कंपन्या कर्ज परतफेडीसाठी डीफॉल्ट ठरताना दिसत आहेत. मार्चमध्ये फ्यूचर रिटेलने 5322 कोटींचे आणि फ्यूचर एंटरप्राइजेस लिमिटेडने 2835 कोटींचे कर्ज परतफेडीत डीफॉल्ट ठरले आहेत. रिलायन्स आणि फ्यूचर ग्रुपमध्ये साधारणत: 25 हजार कोटींचा करार कोर्टात प्रलंबित आहे.

दोघांच्या भांडणात बँकांचे कोट्यवधींचे नुकसान... कोण आहेत ते दोन धनाढ्य...
रिलायन्स आणि फ्यूचर ग्रुपमध्ये साधारणत: 25 हजार कोटींचा करार कोर्टात प्रलंबित
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः फ्यूचर ग्रुप आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्यातील साधारणत 25 हजार कोटींचा करार कोर्टात प्रलंबित आहे. ‘अ‍ॅमेझॉन’चे प्रमुख जेफ बेझोस (Jeff Bezos) यांना या करारात अडचण आहे, सोबतच जगभरातील अनेक न्यायालयात हे प्रकरण विचाराधीन आहे. आता हाच करार बेझोस आणि अंबानी यांच्यातील वादाचे कारण ठरले आहे. जगातील दोन धनाढ्य लोकांमधील या वादामुळे बँकांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. फ्यूचर ग्रुपच्या कंपन्या (future group companies) कर्ज परतफेडीसाठी डीफॉल्ट ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या समस्येत अधिकच वाढ होताना दिसत आहे. कर्जात बुडालेल्या फ्यूचर रिटेल लिमिटेड कंपनीने शुक्रवारी सांगितले, की ती अ‍ॅमेझॉनसोबत सुरु असलेला खटला आणि संबंधित विषयांमुळे वित्तीय संस्थांना 5,322.32 कोटी रुपयांची वेळेवर परफेड करु शकलेली नाही.

मागील वर्षी ‘एफआरएल’ने बँकांच्या एका गटासोबत कोविडने प्रभावीत झालेल्या कंपन्यासाठी ‘वन टाईम रिस्ट्रक्चरिंग’ योजनेबाबत एक करार केला होता. आणि त्यावर ‘इक्विटी’च्या माध्यमातून 31 मार्च 2022 च्या पूर्वी 3,900 कोटी रुपये गोळा करण्याची जबाबदारी सोपवली होती. ‘एफआरएल’ने सांगितले, की कंपन्यांवर 31 मार्च 2022 रोजी किंवा त्या पुर्वी गटात सहभागी विविध बँका आणि कर्जदेणाऱ्यांना एकूण 5322.32 कोटी रुपयांचे परतफेड करण्याची जबाबदारी होती. असे असताना अनेक कंपन्यांनी सांगितले, की अ‍ॅमेझॉन डॉट कॉम एनवी इन्वेस्टमेंट होल्डिंग एलएलसी सोबत सुरु असलेला खटला आणि इतर विषयांमुळे त्या इक्विटी योगदानाच्या माध्यमातून पैसे गोळा करुन शकल्या नाहीत, त्यामुळे यातून साहजिकच कर्जदाते व बॅंकांचे मोठे नुकसान झाले.

फ्यूचर एंटरप्राइजेज 2835 कोटींचा परतफेड डिफॉल्ट

फ्यूचर ग्रुपची अजून एक कंपनी फ्यूचर एंटरप्राइजेज लिमिटेडने शुक्रवारी सांगितले, की ती विविध कर्जदारांना 2835 कोटी रुपये परत देण्यासाठी अकार्यक्षम ठरली आहे. ‘एफइएल’ने शेअर बाजारात सांगितले, की ‘लेंडर्स’ला 31 मार्चपर्यंत एकूण 2835 कोटी रुपयांचे देणे गरजेचे होते, परंतु ते शक्य होउ शकलेले नाही. दरम्यान, बॅंकाच्या एका गटासोबत कोविडमुळे प्रभावित कंपन्यांसाठी वन टाइम रिस्ट्रक्चरिंग योजनेअंतर्गत एमइएलचा मुल्यांकन अवधी हा तीस दिवसांचा आहे. कंपनीने सांगितले, की याबाबतच्या पुढील घडामोडींबाबत ते माहिती देत राहतील.

संबंधित बातम्या

Indian Railway News: राजस्थान आणि महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी Summer Special ट्रेन, वाचा सविस्तर

Pune Crime | धक्कादायक! पुण्यात इमारतीच्या डक्टमध्ये आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह

Nana Patole on Chandrakant Patil : ईडी भाजपची घरगडी आहे का? चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर नाना पटोलेंचा घणाघात