मुंबई: अलीकडच्या काळात क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. विविध बँकेची क्रेडिट कार्ड आकर्षक आॉफरसह बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, कोणत्याही शुल्काविना आणि मोफत वापर शुल्क आॉफर असलेले क्रेडिट कार्ड (Free Credit Card)कुणी देत नसल्यास नक्की विचार करा. क्रेडिट कार्ड हे डिजिटल व्यवहार करण्याचं साधन आहे. डेबिट व क्रेडिट कार्डच्या वापराबाबत मुलभूत फरक आहे. आकर्षक क्रेडिट कार्डच्या प्लॕनबाबत सांगणारे एजंट अधिक असतात. मात्र, क्रेडिट कार्डवरील छुप्या शुल्काबाबत ग्राहकाला सुरुवातीच्या टप्प्यावर माहिती दिली जात नाही. हजारो रुपयांचे आॉफर असलेले क्रेडिट कार्ड तुम्हाला तोट्यातही नेऊ शकतात.
स्वस्तात मस्त आॉफरची मार्केटिंग करणारे क्रेडिट कार्ड तुम्हाला महागात पाडू शकतात. प्रत्येक कार्डच्या वापराच्या अटी व शर्तींचे प्रकटीकरण दिले जाते. मात्र, काही शुल्का संबंधित अटी छुप्या स्वरुपाच्या असतात व आपल्या वापराच्या अधीन असतात. बँकेच्या एजंटद्वारे अशा शुल्कांची माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते.
जाणून घेऊया क्रेडिट कार्डवरील विविध शुल्क:
क्रेडिट कार्डवरील वार्षिक शुल्कात एकसमानता नसते. विविध बँकाकडून विभिन्न प्रकारचे कार्ड शुल्क आकारले जातात. काही बँका अशास्वरुपाचे शुल्क आकारतही नाही. कार्ड घेण्यापूर्वीच वार्षिक शुल्काची माहिती निश्चितपणे जाणून घ्या. तुम्ही वर्षभरात क्रेडिट कार्डचा वापर न केल्यास शुल्क परताव्याचे देखील धोरणाची खात्री करुन घ्या. तुम्ही वार्षिक शुल्क अधिक असलेल्या क्रेडिट कार्डची निवड तुमच्या गरजेनुसारच करा.
तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल विहित मुदतीनंतर अदा केल्यास तुम्हाला व्याजासहित दंड भरावा लागू शकतो. तसेच विलंबाने अदा करण्यासाठी दंडाच्या रकमेचा भुर्दंडही सहन करावा लागू शकतो. तुमच्या कार्डवरील थकित रकमेवर दंडासहित व्याजाची रक्कम ठरते.
क्रेडिट कार्ड वापराची विशिष्ट मर्यादा असते. मात्र, अनेक वापरकर्त्यांना याविषयी सुस्पष्टच कल्पना नसते. मर्यादेपेक्षा अधिक वापरही करू शकतात. मात्र, त्यासाठी तुम्हाला निश्चितच शुल्क भरावे लागेल. तुम्ही कार्डचा वापर करताना क्रेडिट कार्ड मर्यादा लक्षात असू द्या. कंपन्यांद्वारे वापरकर्त्याने 80% वापराचे उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर अलर्ट पाठवलाच जातो.
Video : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 9 PM | 16 December 2021 https://t.co/eJMp6b6zD7 @OfficeofUT @AjitPawarSpeaks #Headlines #MahaFastNews #fastnews #SuperFastnews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 16, 2021
संबंधित बातम्या:
भुसावळमध्ये भाजपला भगदाड, 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश; नाथाभाऊंच प्रचंड शक्तीप्रदर्शन
TET Exam : कोण आहेत तुकाराम सुपे?, ओळखपत्रांमुळे बिंग फुटले; रिचेकिंगच्या नावाखाली घोटाळा