Budget 2024 | बजेट 2024 सादर होण्याच्या काहीवेळ आधी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांना एक चांगली बातमी मिळाली. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या आकड्यानुसार दोघांच्या संपत्तीत चांगली वाढ झाली आहे. जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या संपत्तीत घसरण झाली आहे. खास बाब म्हणजे मायक्रोसॉफ्ट फाऊंडर्सच्या संपत्ती संयुक्तपणे 16 अब्ज डॉलरपेक्षा जास्तची घसरण झाली. महत्त्वाची बाब म्हणजे जगातील टॉप 20 अब्जाधीशांमध्ये फक्त अंबानी आणि अदानीच असे आहेत, ज्यांच्या नेटवर्थमध्ये वाढ झालीय. आशियातील दोन मोठ्या अब्जाधीशांच्या संपत्तीत किती वाढ झालीय? ते जाणून घेऊया.
मुकेश अंबानी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत. टॉप 20 अब्जाधीशांपैकी त्यांच्या संपत्तीत जास्त वाढ झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये वाढ झाली. त्यामुळे नेटवर्थमध्ये 1.42 बिलियन डॉलर म्हणजे 12 हजार कोटींची वाढ झाली. त्यांची एकूण संपत्ती 106 बिलियन डॉलरच्या पुढे गेली आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 9.91 अब्ज डॉलरची वाढ दिसून आलीय. सध्याच्या काळात मुकेश अंबानी हे जगातील 11 वे श्रीमंत उद्योजक आहेत.
फक्त दोन भारतीय उद्योजकच सरस
दुसऱ्या बाजूला अदानीच्या संपत्तीतही वाढ झालीय. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या आकड्यानुसार 825 मिलियन डॉलर म्हणजे 6800 कोटी रुपयापेक्षा जास्त वाढ दिसून आलीय. त्यांची एकूण संपत्ती 95.9 अब्ज डॉलर झालीय. टॉप 20 अब्जाधीशांमध्ये ते दुसरे उद्योजक आहेत, ज्यांच्या संपत्तीत वाढ झालीय. विद्यमान स्थितीत अदानी जगातील 14 वे श्रीमंत उद्योजक आहेत. यावर्षी त्यांच्या संपत्तीत 11.6 बिलियन डॉलरची वाढ दिसून आलीय.
अमेरिकन उद्योजकांची काय स्थिती?
जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झालीय. सगळ्यात जास्त घसरण मायक्रोसॉफ्टचे फाऊंडर्स लॅरी पेज यांची नेटवर्थ में 8.81 बिलियन डॉलरने झाली. सर्जी ब्रिन यांच्या नेटवर्थमध्ये 8.28 बिलियन डॉलरची घसरण झाली. जेफ बेजोस, स्टीव बॉल्मर मार्क जुकरबर्ग एलन मस्क यांच्या संपत्तीत 3 बिलियन डॉलरची घसरण झाली. लॅरी एलिसन आणि बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या संपत्तीत 2 बिलियन डॉलरपेक्षा जास्त घसरण झाली.