देशपातळीवरील तसेच जागतिक घडामोडींचा शेअर बाजारावर परिणाम होत असतो. भारतातील लोकसभा निवडणुकाही याला अपवाद नाहीत. देशात कोणाच सरकार येणार? यावरही शेअर बाजाराची उसळी आणि पडझड अवलंबून असतात. कारण सरकारनुसार आर्थिक धोरण ठरतात. भारतात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. सात पैकी निवडणुकीचे पाच टप्पे झाले आहेत. देशात भाजपा प्रणीत NDA आणि काँग्रेस प्रणीत INDIA आघाडीमध्ये सामना आहे. दोन्ही बाजूंकडून जय-पराजयाचे दावे-प्रतिदावे सुरु आहेत. लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अजून मतदानाचे दोन टप्पे बाकी आहेत. मात्र, त्याआधीच शेअर बाजाराने आपला कल दाखवायला सुरुवात केली आहे. सेंसेक्स आताच 75 हजार पार गेला आहे. निफ्टी ऑल टाइम हाय आहे. निफ्टीने आजच्या व्यवहाराच्या सत्रात आतापर्यंतच सर्वाधिक 22,841 चा आकडा टच केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मीडिया हाऊसला मुलाखत देताना सांगितलय की, निवडणुकीचा रिजल्ट येऊ दे. मार्केट आपले आधीचे सर्व रेकॉर्ड मोडेल. ‘निवडणूक रिजल्टच्या पार्श्वभूमीवर लोक बाजारात गुंवतणूकीसाठी इच्छुक दिसतायत. म्हणूनच बाजाराने ऑलटाइम हाय टच केलय’ असं जियोजित फायनेंशियल सर्विसेजचे सीनिअर वाइस प्रेसिडेंट गौरांग शाह बाजारातील तेजीवर म्हणाले आहेत. 1 जूनला एग्जिट पोल येणार आहेत. त्यानंतर दुसऱ्यादिवशी बाजराचा कल स्पष्ट होईल.
सेन्सेक्स, निफ्टीचा नवीन रेकॉर्ड
आज सकाळी बाजार उघडला, त्यावेळीच मार्केटमध्ये तेजी दिसून आली. 30 शेअर्सचा BSE सूचकांक सकाळच्या सत्रात 41.65 अंकांनी वाढून 74,262.71 अंकांवर पोहोचला. 1 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्सने 75 हजाराचा टप्पा ओलांडला. NSE निफ्टी 20.1 अंकाच्या वाढीसह 22,617.90 अंकावर राहीला. थोड्याच वेळात निफ्टीने 22,841 अंकांवर पोहोचून सर्व रेकॉर्ड मोडले.
कुठल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी?
लिस्टेड कंपन्यांमध्ये लार्सन एंड टुब्रो, एशियन पेंट्स, एक्सिस बँक, भारतीय स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, टायटन आणि भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. पावर ग्रिड, सन फार्मा, जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा स्टीलचे शेअर्स पडले.